Prahaar Stock Market: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय शेअर बाजारात धुमाकूळ! आयटी, फार्मा, शेअरसह गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

मोहित सोमण:शेअर बाजारात आज अखेरच्या सत्रात भूकंप आला आहे. फार्मा,आयटी शेअरमधील सेल ऑफ वाढल्याने सेन्सेक्स थेट ७३३.२२ अंकाने व निफ्टी २३६.१५ अंकाने कोसळला असल्याने सलग सातव्या सत्रात आज शेअर बाजारात घसरण झाली आ हे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटीचे नुकसान झाले आहे. आज सेन्सेक्स ८०४२६.४६ पातळीवर व निफ्टी २४६५४.७० पातळीवर स्थिरावला आहे. सकाळप्रमाणेच संध्याकाळीही बँक निर्देशांकातही घसरण झाल्याने बाजार गडगडण्यात बँक शेअरचा मोठा सहभाग आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह विशेषतः आयटी,फार्मा कंपन्यांच्या मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये अधिक नुकसान झाले. आज मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी भारतीय अस्थि रता निर्देशांक (VIX Volatility Index) ५.९५% पातळीवर उसळला आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण आयटी (२.४५%), पीएसयु बँक (१.७८%), हेल्थकेअर (२.०६%), मिड स्मॉल हेल्थकेअर (२.१२%), कंज्यूमर ड्युरेबल्स (२.१९%), फार्मा (२.१४%) निर्देशांकात झाली आहे. आज युएस राष्ट्राध्यक्ष डोना ल्ड ट्रम्प यांच्या फार्मा उत्पादनावर १००% टॅरिफ लावण्याच्या निर्णयासह ट्रम्प यांनी फर्निचर, किचन उत्पादनावर अतिरिक्त शुल्क वाढवले आहे. दरम्यान या मोठ्या दरवाढीमुळे आज फार्मा शेअर दबावाखाली येत होता. तर दुसरीकडे सातत्याने युएसकडून एच १बी व्हिसावर आकारलेल्या १ लाख डॉलर्सचे शुल्काचा फटका आशियाई बाजारात कायम असताना आता Accenture कंपनीच्या घसरलेल्या आर्थिक निकालानंतर आयटी बाजारात घसरण झाली आहे. युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात गेल्या आठवड्यात क पात केली असली तरी आगामी युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या भाषणाकडे, तसेच काल घोषित झालेल्या जीडीपी आकडेवारीसह उद्या जाहीर होणाऱ्या पीसीई (Personal Consumption Expenditure) आकडेवारीकडे गुंतवणूकदा रांचे लक्ष लागल्याने अस्थिरता कायम आहे. याखेरीज आता कमोडिटी बाजारातही मोठ्या प्रमाणातील अस्थिरतेत सोन्याचांदीत मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. आज डॉलरमधील सकाळपर्यंत वाढ दुपारपर्यंत घसरणीत बदलली व रुपयाने किरकोळ वाढीने वापसी संध्याकाळपर्यंत केली. बाजारातील फंडा मेटल मजबूत असतानाही या अस्थिरतेचा फटका वारवार बाजाराला बसत आहे.


आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद कायम असून आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात मात्र जवळपास सगळ्याच बाजारात मोठी घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण टॅरिफ घडामोडींनंतर होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना उ द्याही सावधगिरीचा सल्ला दिला जातो.


आजच्या बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ गोदरेज अँग्रोवेट (४.०९%), ज्युपिटर वॅगन्स (३.८८%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.५१%), लार्सन अँड टयुब्रो (२.३४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.२७%), एचबीएल इंजिनिअरिंग (१.९३%), टाटा मोटर्स (१.२९ %),आयटीसी (१.३५%), अशोक लेलँड (१.२५%), टोरंट फार्मास्युटिकल (०.५८%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण वोक्हार्ट (९.४६%), वोडाफोन आयडिया (७.६०%), वारी एनर्जीज (६.८९%), एचएफसीएल (५.६३%),एसईएमई सोलार होल्डिंग्स ( ४.९५%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (४.६१%), बलरामपूर चिनी (४.५९%), पीबी फिनटेक (४.२३%), ब्रेनबीज सोलूशन (४.१९%), झायडस लाईफसायन्स (४.३४%), डिवीज लॅब्स (३.५२%), कोफोर्ज (३.३२%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील एकूण परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय बाजारपेठेत रक्तपात झाला, जो आशियाई बाजारपेठांमधील पराभवाचे प्रतिबिंब आहे. औषधां वर लक्ष्यित कर लाटेच्या नवीन लाटेमुळे गुंतवणूकदारांच्या भावना डळमळीत झाल्या, ज्यामुळे फार्मा समभाग खोलवर घसरले. दरम्यान, एक्सेंचरच्या कमकुवत मार्गदर्शनामुळे आणि नोकऱ्यांमध्ये कपातीमुळे आयटी खर्चात घट दिसून आली, एआय-चालित वाढ अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. जागतिक अनिश्चिततेमध्ये गुंतवणूकदार सावध राहिले आहेत, जवळच्या काळात देशांतर्गत गुंतवणूक आणि वापरावर लक्ष केंद्रित करतील.'


युएसकडून झालेल्या टॅरिफवाढीवर भाष्य करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष इन्स्टिट्युशनल रिसर्च विश्लेषक तुषार मनुधने म्हणाले आहेत की,'ब्रँडेड/पेटंट औषधांवर जाहीर केलेले शुल्क पाहता, भारतीय फा र्मा कंपन्यांनी केलेल्या जेनेरिक निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकेला निर्यातीचा मोठा भाग जेनेरिक औषधांचा असतो.म्हणून आम्हाला वाटते की जेनेरिक फार्मा कंपन्यांसाठी हे नेहमीचे व्यवसाय आहे. सीडीएमओ कंपन्यांच्या बाबतीतही, ते इनो व्हेटर/जागतिक फार्मा कंपन्यांसाठी फॉर्म्युलेशनचा भाग नसून उत्पादनाचा भाग बनवतात. तसेच, सीडीएमओ कंपन्या केवळ अमेरिकन बाजारपेठेसाठीच नव्हे तर इनोव्हेटर फार्मा कंपन्यांच्या जागतिक गरजा पूर्ण करतात. तसेच, इनोव्हेटर कंपन्यांचा एकूण क च्चा माल विक्रीच्या सुमारे ४-५% असतो. कच्च्या मालाच्या स्त्रोताचा बदल हा दीर्घकाळ चालणारा व्यायाम आहे आणि त्यात क्षमता, क्षमता तसेच अनुपालन यासारख्या अनेक अडथळ्यांचा समावेश आहे, असा आमचा विश्वास आहे की, इनोव्हेटरकडून खर्च शोषून घेण्याची किंवा ग्राहकांना देण्याची संधी आहे. इनोव्हेटरकडे पेटंट एक्सक्लुझिव्हिटीचा मर्यादित कालावधी आहे आणि तो विक्री वाढवण्यासाठी वेळ वापरू इच्छितो. औषधांवरील शुल्काची सविस्तर समज मिळविण्यासाठी आम्ही अजूनही कार्यकारी आदेशाची वा ट पाहत आहोत.'


त्यामुळे आजही शेअर बाजार केवळ अस्थिरतेचा नाही तर घरगुती गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरला आहे. तरीही अजून मजबूत फंडामेंटलमुळे नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्यास फारसा काळ लागणार नाही अशी शक्यता आहे. बाजार सध्या कं सोलिडेशन एकत्रीकरणातून जात असल्याने बाजार नव्या आव्हानांना सामोरे जात आहे. उद्याच्या बाजारातील आयटी, फार्मा, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये होणारी हालचाल पाहणे गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

लडाखमधील हिंसाचार प्रकरणी सोनम वांगचुकला अटक

लेह : लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा

Gold Silver Rate Today: सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ ! जगात सोना चांदीचे दर का वाढत आहे त्याचे भारतावर काय परिणाम वाचा सविस्तर

मोहित सोमण: सलग दोनदा घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. तर चांदीच्या दरात तीन दिवसांच्या

राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या

भारतात हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण का वाढले? पहा काय म्हणाले जागतिक तज्ज्ञ

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका 'एलीव्‍हेटेड लिपोप्रोटीन(ए)'कडे

Pace Digitek Ltd IPO Day 1: आजपासून पेस डिजिटेक आयपीओ बाजारात तुम्ही भविष्यातील कमाईसाठी हा शेअर खरेदी करावा? का जाणून घ्या माहिती

मोहित सोमण:पहिल्या दिवशी पेस डिजिटेक लिमिटेड (Pace Digitek Limited) कंपनीच्या आयपीओला एकूण ०.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले

पंतप्रधान मोदींचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौरा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो ३ च्या अंतिम