आजचे 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सलग सहाव्या सत्रात शेअर बाजारात घसरण गुंतवणूकदारांचे सेल ऑफ सुरूच, ३ लाख कोटीहून बाजारात नुकसान

मोहित सोमण: आजही अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. प्रामुख्याने आयटी, रिअल्टी, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, एफएमसीजी या निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने बाजार कोलमडून गेले. त्यामुळे आज बाजारात तीन लाख कोटीहून अधिक गुंतवणूकीचे नुकसान झाले.आज इक्विटी बेंचमार्क मोठ्या प्रमाणात झाल्याने आज शेअर बाजार सलग सहाव्या सत्रात कोसळले आहे. आजही सेल ऑफ झाल्याने व हेवीवेट शेअर्समध्ये विक्री सुरूच राहिल्याने घरगुती गुंतवणूकदारांची गुंतवणूक निर्देशांका तील सपोर्ट लेवल वाचवू शकली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धक्यानंतर एच१बी व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय बाजारातील संरचना बदलत आहे. अखेरच्या सेन्सेक्स ५५५.९५ व निफ्टी १६६.०५ अंकाने कोसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स पातळी ८११५९.६८ व निफ्टी पातळी २४८९०.८५ पातळीवर स्थिरावली आहे.


आज अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही घसरण झाली. घसरणीत सर्वाधिक वाटा टाटा मोटर्स, टीसीएस, एशियन पेटंस, ट्रेंट, एसबीआय या शेअरचा होता तर सर्वाधिक वाढ आज भारती एअरटेल, बीईएल, अँक्सिस बँक, एचडीएफसी बँक या सम भागात झाली. सकाळची मिडकॅप व स्मॉलकॅपमधील घसरण अखेरच्या सत्रात आणखी वाढल्याने बाजारात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.सर्वात विशेष म्हणजे सकाळी किरकोळ वाढलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा २.४७% वाढल्याने बा जारात पडझड कायमच राहिली आहे.युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.२८%), नासडाक (०.३४%) बाजारात घसरण झाली असून डाऊ जोन्स (०.११%) मध्ये वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सकाळचा संमिश्री त प्रतिसाद काय राहिला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात दिवसभरात मेटल (०.२२%) वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. सर्वाधिक घसरण आयटी (१.२७%), रिअल्टी (१.६५%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.१६%) निर्देशांकात झाली.


आज हिंदुस्थान कॉपर (६.३२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (५.७७%), अदानी पॉवर (३.११%), हिंदुस्थान झिंक (३.०६%), वेंदाता (२.९४%), भारती हेक्साकॉम (२.३८%), आरबीएल बँक (१.८९%), पीटीसी इंडस्ट्रीज (१.८६%), गोदरेज इंडस्ट्रीज (१.८१%), कोचीन शि पयार्ड (१.६८%) या समभागात (Stocks) झाली आहे. तर आज सर्वाधिक घसरण टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (५.५५%), आदित्य बिर्ला फॅशन (४.१९%), होम फर्स्ट फायनान्स (३.९४%), रामकृष्ण फोर्ज (३.९१%), कल्याण ज्वेलर्स (३.४५%), ट्रेंट (३.१५%), स्वि गी (२.१४%), टाटा मोटर्स (२.७३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय बाजारांनी सलग पाचव्या सत्रात तोटा सहन केला कारण गुंतवणूकदारांनी सततच्या FIIs च्या बाहेर जाण्याच्या प्रवाहात आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेवरील अनिश्चिततेमुळे नफा बुक केला, ज्यामुळे Q2 GDP वाढीवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. ऑटो, आयटी, फार्मा आणि आरोग्यसेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाली, तर चीनच्या तरलता समर्थन आणि तांब्याच्या पुरवठ्याच्या चिंतेमुळे धातूंमध्ये वाढ झाली. एकूणच, भारताच्या H2FY26 कर्ज घेण्यापूर्वी आणि आठवड्याच्या अखेरीस जाहीर होण्याच्या अपेक्षेनुसार अमेरिकेच्या मॅक्रो इकॉनॉमिक डेटापूर्वी भावना सावध राहते.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'गुरुवारी भारतीय बाजार कमकुवत सुरुवातीनंतर घसरणीला सुरुवात करत होते. निफ्टीमध्ये संपूर्ण सत्रात मंद आणि स्थिर घसरण दिसून आली, तर बहुतांश व्यवहार बाजूलाच झाले. विशेष म्हणजे, निर्देशांक २५,००० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली घसरला आणि या महत्त्वाच्या तांत्रिक आणि मानसिक पातळीच्या खाली टिकून राहिला, ज्यामुळे भविष्यात आणखी कमकुवतपणाची चिंता निर्माण झाली. यूए स एच-१बी व्हिसा शुल्कात प्रस्तावित वाढीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत राहिली कारण जोखीम घेण्याची क्षमता कमी होत गेली. डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, मॅरिको, नौकरी, सिंजीन, क्रॉम्प्टन आणि अ‍ॅक्सिस बँक सारख्या काउंटरमध्ये लक्षणीय हालचाल दिसून आली, जी व्यापक बाजारातील कमकुवतपणा असूनही स्टॉक-विशिष्ट संधी दर्शवते.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना सेंट्रम ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य रिसर्च विश्लेषक निलेश जैन म्हणाले आहेत की,'बाजाराने सलग पाचव्या सत्रात घसरणीचा सिलसिला सुरू ठेवला, कमीत कमी उच्चांक आणि कमीत कमी पातळी सुरू ठे वली. निफ्टीने २५००० पातळीची महत्त्वाची आधार पातळी ओलांडली, जी आता तात्काळ प्रतिकार म्हणून काम करण्याची अपेक्षा आहे. गती निर्देशक, विशेषतः MACD, यांनी दैनिक चार्टवर नवीन विक्री क्रॉसओवरचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात मा सिक F&O समाप्ती जवळ येत असल्याने, निफ्टीने २५००० पातळीचा टप्पा पुन्हा मिळवला तर शॉर्ट-कव्हरिंग रॅली शक्य आहे. नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार ५०-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी २४८७६ पातळीवर आहे आणि या पातळीपेक्षा कमी ब्रेक निर्देशां क २४६०० झोनकडे आणखी खाली नेऊ शकतो.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपया ०.०६ रुपयांनी वाढून ८८.६७ वर व्यवहार करत आहे, तर डॉलर निर्देशांक स्थिर राहिला आहे. कि रकोळ वाढ असूनही, सततच्या FII विक्रीमुळे एकूण भावना कमकुवत राहिल्या आहेत, तर जागतिक स्तरावर सोन्याच्या वाढलेल्या किमती देखील रुपयावर भार टाकत आहेत कारण भारत हा एक प्रमुख निव्वळ आयातदार आहे. GDP, नवीन आणि विद्यमान घ र विक्री आणि जागतिक प्रवाहांना मार्गदर्शन करू शकणाऱ्या कोर PCE किंमत निर्देशांकासह आगामी यूएस डेटावर लक्ष केंद्रित केले आहे. रुपयाची श्रेणी ८८.४५-८९.०० दरम्यान अपेक्षित आहे.'

Comments
Add Comment

२०३० पर्यंत क्रीडा अर्थव्यवस्था ४० अब्ज डॉलर होणार - अहवाल

KPMG अहवालातील मोठी अपडेट प्रतिनिधी: इतर क्षेत्रीय अर्थव्यवस्थेसह क्रीडा क्षेत्रातील अर्थव्यवस्था तेजीत

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सची पर्वा नाही, म्हणतात, त्यांना त्यासाठी पैसे मिळतात..

अमृता फडणवीस यांची परखड मुलाखत! मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता

भारतात स्त्री-पुरुष वेतनात अजूनही मोठी दरी: Naukri सर्वेक्षण

करिअर ब्रेक व लिंगभेदामुळे स्त्रियांना २०% पेक्षा अधिक वेतन तफावत मुंबई: भारतात स्त्री-पुरुषांच्या वेतनात

Gold Rate Today: सलग दुसऱ्यांदा सोन्यात घसरण ! उच्चांकी पातळीवरून पुन्हा घसरणीसह सोने अस्थिरतेच्या गर्तेत पुढे सोन्याचे काय होणार? जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण:आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात गुंतवणूक घसरण झाली आहे. आज जागतिक बाजारापेठेत विशेष कुठला 'टिग्रर' नसल्याने

UPI द्वारे डिजिटल गोल्ड गुंतवणूकीत ९५% वाढ मात्र डिजिटल सोन्यात गुंतवणूक करावी का जाणून घ्या 

प्रतिनिधी:एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) नव्या आकडेवारीनुसार, युपीआय (Unified Payment Interface UPI) व्यवहारातून सोने खरेदी

२०२६ च्या अखेरीस सेन्सेक्स ९४००० वर पोहोचेल भारताला 'तटस्थ' वरून 'ओव्हरवेट' Ratings - HSBC अहवालातील माहिती

प्रतिनिधी:जागतिक ब्रोकरेज एचएसबीसीने भारताला 'तटस्थ' वरून 'ओव्हरवेट' असे श्रेणी सुधारित केले आहे, त्याखेरीज