टाटा मोटर्सच्या शेअरला जागतिक ग्रहण ! थेट ४% शेअर कोसळले

मोहित सोमण:टाटा मोटर्स लिमिटेड (Tata Motors) कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे.आज सत्राच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सचा शेअर ४% घसरला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आ धारे ही घसरण होत आहे. वृत्तसंस्थेतील माहितीनुसार, टाटा मोटर्सचे युनिट जग्वार लँडरोव्हर (JLR) या कंपनीतील सायबर अटॅक झालेल्या घडामोडीमुळे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. नेमक्या वृत्तानुसार, कंपनीच्या संकेतस्थळावर, आणि सायबर इन्फ्रा स्ट्रक्चरवर सायबर हल्ला झाला. त्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी हे नुकसान विमा नसल्याने २ अब्ज डॉलरचे असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.तज्ञांच्या मते,खरोखरच जेएलआरला २ अब्ज पौंडांचा फटका बसणार असेल, तर उ त्पादन बंद झाल्यामुळे आधीच होणाऱ्या नुकसानासह, तो २०२५ च्या संपूर्ण आर्थिक वर्षातील त्याच्या करपश्चात नफ्यापेक्षा जास्त असेल, जो १.८ अब्ज पौंड होता.


उपलब्ध माहितीनुसार, सायबर हल्ल्यामुळे उत्पादन थांबवण्याची मुदत २४ सप्टेंबरपर्यंत वाढवल्यानंतर नंतर जेएलआरने १ ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवली होती. उत्पादन थांबवल्यामुळे कंपनीला होणाऱ्या आर्थिक नुकसानाची अधिकृतपणे गणना केलेली नसली तरी, एका उपलब्ध अहवालांनुसार कंपनीला आठवड्यातून ५० दशलक्ष पौंड किंवा ६८ दशलक्ष पौंडांचे नुकसान होत आहे. ३३००० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना ही समस्या सुटेपर्यंत घरी राहण्यास सांगण्यात आले आहे.वृत्तानुसार, जेएलआरने सायबर विमा मिळवला नव्हता, जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र विमा कंपनीपैकी एक असलेल्या लॉकटनने मध्यस्थी केलेला करार मात्र प्रत्यक्षात येऊ शकला नाही असे वृत्तपत्राचे म्हणणे आहे. कव्हरेजच्या अभावामुळे कंपनीला मोठ्या आर्थिक जोखमीचा सामना करावा लागला आहे, ज्या मुळे ऑपरेशनल जोखीम व्यवस्थापनातील भेद्यता अधोरेखित झाली आहे.


आज सकाळच्या सत्रात ४% घसरण झाल्यावर आज दुपारी १.११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.६१% घसरण झाली आहे. दिवसभरात २-४% घसरण पहिल्या सत्रात सुरुच होती. खरं तर टाटा मोटर्ससाठी जेएलआर हा एक अतिशय महत्वपूर्ण कंपनी आहे.का रण कंपनीच्या एकत्रित टॉपलाइन व्यवसायात त्याचा वाटा ७०% आहे.टाटा मोटर्सने अलीकडेच घोषणा केली होती की, कंपनीने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी १०००० हून अधिक वाहने वितरित केली आणि २५००० हून अधिक चौकशी देखील झाल्या आहेत ज्यामुळे उत्सवाच्या हंगामाची चांगली सुरुवात झाल्याचे दिसून येते. ऑटो कंपन्या पुढील आठवड्यात महिन्यासाठी त्यांच्या विक्री डेटाचा अहवाल देतील. बुधवारीही कंपनीचा शेअर ३% पर्यंत कोसळला होता.

Comments
Add Comment

ICICI Prudential AMC IPO: अखेर ठरलं ! देशातील सर्वात मोठी AMC आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंटचा १०००० कोटीचा आयपीओ लवकरच बाजारात 'ही' असेल तारीख

मोहित सोमण: लवकरच बहुप्रतिक्षित आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट (ICICI Prudential Asset Management) आयपीओ बाजारात दाखल होणार

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तज्ज्ञांकडून आरबीआयच्या पावलाचे स्वागत- एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटचा अहवालातून दुजोरा

मुंबई: एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटने दिलेल्या अहवालानुसार, वित्तीय पतधोरण समितीने जाहीर केलेल्या

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात आढळली बेवारस बॅग, पोलीस तपासाला सुरुवात

मुंबई : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारबॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत विलेपार्ले

भारत-चीन सीमेजवळ मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कराला अटक

गंगटोक : मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कर यांगचेन लाचुंगपा अखेर तपासयंत्रणांच्या जाळ्यात अडकली आहे. भारत-चीन