शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा


मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाताहात झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरसावले आहे. लालबागच्या राजा मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी भावना व्यक्त करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठीचा धनादेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुपूर्द केला. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.


महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून राज्यातील पुराचा फटका बसलेल्यांना मदत केली जाणार आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.


कालपर्यंत ज्या नद्यांचे पाणी शेती फुलवत होते त्याच नद्या पुरामुळे फुगल्या आहेत. शेतीचे अतोनात नुकसान करत आहे. ठिकठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. उभी पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. काही उरलंच असेल तर सडून गेल्यामुळे न वापरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. हजारो नागरिकांना नेसत्या वस्त्रांनिशी राहते घर सोडून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन मदतकरत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी वैयक्तिकरित्या पण मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे.


Comments
Add Comment

महानगरपालिकेच्‍या अतिधोकादायक न्‍यू माहीम शाळेचा पुनर्विकास, पुन्हा त्याच ठिकाणी बांधणार शाळा

मुंबई (खास प्रतिनिधी) : न्‍यू माहीम महानगरपालिका  मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य

‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’

पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार प्रस्तावित

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास होणार सुसाट मुंबई : पूर्व मुक्तमार्ग म्हणजेच इस्टर्न फ्रीवेच्या विस्तार करण्याचा