Gold Rate Today: सलग दुसऱ्यांदा सोन्यात घसरण ! उच्चांकी पातळीवरून पुन्हा घसरणीसह सोने अस्थिरतेच्या गर्तेत पुढे सोन्याचे काय होणार? जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण:आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात गुंतवणूक घसरण झाली आहे. आज जागतिक बाजारापेठेत विशेष कुठला 'टिग्रर' नसल्याने आज सोने स्वस्त झाले आहे. युएस फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष युएसमधील वैय क्तिक उपभोग खर्च (Personal Consumption Expenditure PCE) आकडेवारी व आगामी युएस फेडरल रिझर्व्ह गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या भाषणाकडे लागल्याने सोन्यातील गोल्ड स्पॉट फ्युचरमधील मागणी आजही कमी झाली. आज सातत्याने वाढत अ सलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची रिकव्हरी झाल्याने आज भारतीय सराफा बाजारात सोने स्थिरावले आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९३ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८५ रूपयांनी, १८ कॅरे ट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम सोने २४ कॅरेटसाठी ११४४४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०४९० रूपये, १८ कॅरेटसाठी ८५८३ रूपयांवर पोहोचली आहे.प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी ९३० रूपये, २२ कॅरेटसाठी ८५० रूपये, १ ८ कॅरेटसाठी ७०० रूपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेट ११४४४० रूपयांवर, २२ कॅरेट १०४९०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ८५८३० रूपयांवर गेला आहे. आज जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१६% वाढ झा ली आहे. तर जागतिक स्तरावरील सोन्याचे मानक (Standard Rate) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.५४% वाढ झाली.


भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२३% वाढ झाली असून एमसीएक्स सोन्याची दरपातळी ११२८१४ रूपयांवर गेली आहे. भारतातील मुंबईसह प्रमुख शहरा तील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११४४४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०४९० रूपये, १८ कॅरेटसाठी ८५८३ रूपयांवर गेले आहेत. आज रूपयांनी रिकव्हरी दर्शविली गेल्याने आज सोन्याला वाढत्या दबावात सपोर्ट लेवल मिळाली. मात्र आगामी काळात पुन्हा युएस फेड कमेंट्स आधारे किरकोळ वाढ अथवा घसरण अपेक्षित आहे. मुख्यतः पुढील काही दिवस तरी अस्थिरता कायम राहिल अशी शक्यता आहे.


आजच्या सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' सोन्याचा भाव सकारात्मक राहिला, COMEX वर $3757 वर $22 आणि MCX वर ६०० रूपयाने ११३१४५ वर पो होचला, ज्यामुळे मजबूत तेजीची भावना बळकट झाली. फेडच्या कमी व्याजदर कपातीच्या दृष्टिकोनामुळे आणि २०२५ च्या अखेरीस आणखी कमी होण्याची अपेक्षा, ज्यामुळे बुलियनमध्ये तरलता मजबूत राहील, यामुळे या तेजीला पाठिंबा आहे. जागतिक अनिश्चि तता आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी होत असल्याने सोने आणि चांदीमध्ये खरेदीची आवड निर्माण होत आहे. नजीकच्या काळात, सोने ११२०००– ११४००० रूपये/ $3,700–3,780 च्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये घसरण नवीन खरेदी सं धी म्हणून पाहिली जात आहे.'


आगामी नजीकच्या सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे विश्लेषक मानव मोदी म्हणाले आहेत की,'कालच्या सत्रात सोन्याच्या किमती शिखरावरून घसरल्या, काही प्रमाणात नफा वाढणे, USDINR मध्ये अस्थिरता, डॉलर निर्देशांकात थोडीशी वाढ आणि गव्हर्नर पॉवेल यांच्या संमिश्र प्रतिक्रिया यामुळे सोन्याचे भाव घसरले. दर कपातीच्या एका आठवड्यानंतर, फेड गव्हर्नर पॉवेल म्हणाले की अमेरिकन मध्यवर्ती बँकेला अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने महागाईचा धो का असून, कमकुवत रोजगार वाढीमुळे कामगार बाजाराच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होत आहे. फेड पुढील व्याजदर कधी कमी करेल याबद्दल त्यांनी फारसे स्पष्टता दिली नाही.दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को फेडच्या अध्यक्षा डेली म्हणाल्या की गेल्या आठवड्यात फेडने पॉलिसी रेट कमी करण्याच्या निर्णयाला त्यांनी "पूर्णपणे पाठिंबा" दिला आणि पुढे आणखी कपात करण्याची अपेक्षा आहे. भौगोलिक-राजकीय अशांतता सुरक्षित आश्रय खरेदीला पाठिंबा देत आहे, नाटोने रशियाला इशारा दिला की ते स्वतःचे रक्षण करण्या साठी "सर्व आवश्यक लष्करी आणि गैर-लष्करी साधने" वापरतील कारण त्यांनी "वाढत्या बेजबाबदार वर्तनाच्या पद्धतीत" एस्टोनियन हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याबद्दल मॉस्कोचा निषेध केला.


पीबीओसी शांघाय गोल्ड एक्सचेंजचा वापर करून मित्र राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांना त्यांच्या सीमेत सोने खरेदी आणि साठवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. डेटाच्या बाबतीत, यूएस गृहनिर्माण संख्या अपेक्षेपेक्षा चांगली नोंदवली गेली, किंमतींवर वजन. यूएस जीडी पी, महागाई आणि टिकाऊ वस्तू ऑर्डर डेटा सारख्या फेडरल रिझर्व्ह धोरणाबद्दल अधिक माहितीसाठी आता लक्ष अमेरिकेच्या आर्थिक डेटाकडे वळते.'

Comments
Add Comment

CPI Inflation: बँक ऑफ बडोदाकडून ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर! ऑक्टोबर महिन्यातही 'बटाटा' वगळता महागाई नियंत्रणात

प्रतिनिधी:बँक ऑफ बडोदाने (Bank of India) भारतीय बाजारातील सकारात्मकता आपल्या आकडेवारीत कायम ठेवली आहे. त्यामुळे

Google Maps new features : हँड्स-फ्री ड्रायव्हिंग! जेमिनी AI सह गुगल मॅप्समध्ये १० नवीन फीचर्स; काय आहे खास? जाणून घ्या

नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी, गुगलने मॅप्समध्ये जेमिनी AI सह तब्बल १० नवीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'गुड गव्हर्नन्स' साध्य करण्यासाठी वाणिज्य विभाग कामाला ! युद्धपातळीवर कार्यक्षमता आणि स्वच्छ प्रशासनासाठी विशेष मोहीम ५.० पार

प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टानुसार सरकारी विभागांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी सरकारी

Narayan Rane : नारायण राणे यांचं कणकवलीतील युती आणि राज्याच्या विकासावर मोठं भाष्य; राणे म्हणाले उद्धव ठाकरेंशी...

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय आणि

शेअर बाजार अपडेट: ऑक्टोबरमध्ये निफ्टी मिडकॅप १५० आणि निफ्टी ५० हे ४.७९% आणि ४.५१% वाढीसह 'टॉप परफॉर्मर' म्हणून उदयास - मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड

ऑक्टोबरमध्ये लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, मायक्रोकॅप बनले ' 'मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड आणखी महत्वाची आकडेवारी

फसवणूक प्रतिबंधक एमएसएमई वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी सिडबी आणि मोनेटागो भागीदारी जाहीर

नवी दिल्ली:सिडबी (स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI) संस्थेने मोनेटागो (Monetago) सोबत भागीदारी घोषित केली