Anand Rathi IPO Day 3: अखेरच्या दिवसापर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांची आयपीओकडे पाठ तरीही शेअरची GMP ३५ रूपये प्रिमियम दराने सुरु

मोहित सोमण:आनंद राठी इन्व्हेसमेंट सर्विसेस (Anand Rathi Investment Services) लिमिटेडचा आयपीओ आज बंद झाला आहे. आज आयपीओचा अखेरचा दिवस होता.कंपनीला संध्याकाळी ५.५० वाजेपर्यंत एकूण २१.८३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे.ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून ५.११ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४६.२५ पटीने व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ७४५ कोटींचा हा आयपीओ १.८० इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इशूसह बाजारात दाखल झाला होता. २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत असलेला हा आयपीओ (IPO) आज बंद झाल्याने पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २६ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. बीएसई व एनएसई या दोन्ही बाजारात कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे.


कंपनीने प्राईज बँड (Price Band) ३९३ रूपये प्रति शेअर निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओसाठी १४९०४ रूपये (३६ शेअर) गुंतवणूक अनिवार्य होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना २५ रूपये प्रति शेअर सवलतीसह हा आयपीओ उघडण्यात आला होता. Nuvama Wealth Management कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करत होती तर MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करत होती. आनंद राठी,प्रदीप गुप्ता, प्रिती गुप्ता, आनंद राठी फायनांशियल सर्विसेस हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भविष्यातील खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements)साठी करणार असून इ तर दैनंदिन कामकाजासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) २५९६.१८ कोटी रुपये आहे.


कंपनीला एकूण मर्यादित पातळीवरील गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळाला असून किरकोळ गुंतवणूकदारांनी मात्र या आयपीओकडे पाठ फिरवले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाल. तथापि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून आयपी ओला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण आर्थिक वर्षात कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २४% अधिक महसूल मिळाला होता. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३४% वाढ झाली होती.१९९१ मध्ये स्थापन झालेली आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेड ही एक पूर्ण-सेवा ब्रोकिंग कंपनी आहे. ही कंपनी आनंद राठी समूहाचा एक भाग आहे जी विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देते. कंपनी 'आनंद राठी' ब्रँड अंतर्गत ब्रोकिंग सेवा, मार्जिन ट्रेडिंग आणि वित्ती य उत्पादन वितरण प्रदान करते, विविध क्लायंटना इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज आणि चलन बाजारात गुंतवणूक पर्याय देते. आजच्या दिवशी मूळ प्राईज बँड किंमतीपेक्षा २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सच्या आयपीओतील शे अरची जीएमपी (Grey Market Price GMP) ३५ रूपये प्रति शेअर प्रिमियम दराने सुरु होती. रिपोर्टनुसार अंदाजे लिस्टिंग किंमत ४४९ असू शकते म्हणजेच, वरच्या किंमत पट्ट्यापेक्षा (Upper Price Band) प्रति शेअर ८.४५% वाढ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ गुंतवणूकदारांना मिळू शकते.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग

शाहरुख व गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी

हवाई दलाला मिळणार ९७ स्वदेशी लढाऊ विमाने; संरक्षण मंत्रालयाने एचएएलशी केला ६२,३७० कोटींचा करार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच ९७ अत्याधुनिक ‘तेजस मार्क-1ए’ लढाऊ विमाने दाखल होणार आहेत. केंद्र

तरुणाचं ऑपरेशन, पोटातून काढल्या या वस्तू; डॉक्टर पण चक्रावले

हापूड : उत्तर प्रदेशमधील हापूड येथे एक तरुण पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार सांगत डॉक्टरांकडे आला.

२०३० पर्यंत क्रीडा अर्थव्यवस्था ४० अब्ज डॉलर होणार - अहवाल

KPMG अहवालातील मोठी अपडेट प्रतिनिधी: इतर क्षेत्रीय अर्थव्यवस्थेसह क्रीडा क्षेत्रातील अर्थव्यवस्था तेजीत

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सची पर्वा नाही, म्हणतात, त्यांना त्यासाठी पैसे मिळतात..

अमृता फडणवीस यांची परखड मुलाखत! मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता