आली दिवाळी! रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा!

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रेल्वेच्या गट ‘क’ (ग्रुप-सी) आणि गट ‘ड’ (ग्रुप-डी) स्तरावरील कर्मचाऱ्यांना यावर्षी ७८ दिवसांचा बोनस दिला जाईल. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा सुमारे ११.५ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. बोनसची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे.


बोनस देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ (टेक्निशियन), टेक्निशियन हेल्पर, पॉईंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ अन्य गट ‘क’ चे कर्मचारी रेल्वेतील नॉन-गझेटेड कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस देण्यात येतो, ज्याला उत्पादकता आधारित बोनस असे म्हणतात.


हा बोनस त्यांच्या कामगिरीशी संबंधित असतो आणि प्रत्येक वर्षी सणांच्या आधी दिला जातो. हा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दखल घेतल्याचे प्रतिक मानले जात असून सणासुदीच्या काळात त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा