वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी
रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद;सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन
दिल्ली : माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी आज दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या मांडल्या.रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांशी कोकण विभागातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करताना उदभवनाऱ्या समस्या मांडल्या.सिंधुदुर्ग व परिसरातील महत्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा मिळावा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,पीआरएस काऊंटर,प्रवासी सुविधा उन्नतीकरण,तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,स्थानकाचे आधुनिकीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी यासारख्या अनेक मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या या भेटीमुळे कोकणवासीयांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहेत.