मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरतेनंतर व कालच्या घसरणीनंतर आज मात्र संमिश्र सुरूवात झाल्याने आज बाजारातील प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने २० दि वस परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक बाजारातून काढून घेत असले तरी गेल्या १० दिवसात घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे त्यामुळे बाजाराला 'बुलिश' वातावरण प्राप्त झाल्याचे यातून स्पष्ट होते. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २७.६५ अंकाने व निफ्टी २९.९५ अंकाने घसरला आहे. त्यामुळे बाजारात सस्पेन्स कायम आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र प्रतिसाद कायम आहे. दोन्ही सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत घसरण झाल्याने बाजारात अपेक्षित सपोर्ट लेवल मिळेल का हे अंतिम सत्रात स्पष्ट होऊ शकते.तत्पूर्वी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सुरूवातीच्या कलात केवळ मेटल निर्देशांकात वाढ झाली असून इतर निर्देशांकात केवळ घसरणीकडे कौल स्पष्ट होताना दिसतो. तसेच सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (०.७१%),एफ एमसीजी (०.४६%), रिअल्टी (०.५२%), आयटी (०.३६%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.४८%) निर्देशांकात झाली आहे.
युएस बाजारातील सलग तीन दिवसांच्या रॅलीनंतर काल संमिश्र प्रतिसाद मिळाला. युएस बाजारातील गुंतवणूकदार किंबहुना जागतिक गुंतवणूकदार या आठवड्यातील फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या एका नव्या कार्यक्रमातील भाषणाकडे लक्ष देऊन आहेत. तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दरकपातीचे संकेत मिळत असल्यानेच पॉवेल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. याशिवाय या आठवड्यात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अस लेल्या युएसची महागाई आकडेवारी जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर भूराजकीय अस्थिरतेसह आर्थिक अस्थिरता कायम आहे. घसरणाऱ्या डॉलरच्या तुलनेत काल प्रचंड प्रमाणात वाढलेले सोन्याचांदीचे दरही बाजारात निर्णायक ठरू शकतात. भारतीय कमो डिटी बाजारातील एमसीएक्समध्ये होणारी कमोडिटी हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरेल. कालच्या आयटी शेअर्समध्ये झालेली घसरण आजही कायम राहिल्याने बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या पुढील हालचालीवर बाजाराची दिशा अवलंबून असणा र आहे.
सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ केईसी इंटरनॅशनल (६.१६%), जेबीएम ऑटो (३.३३%), अशोक लेलँड (३.१६%), गुजरात पेट्रोनेट(३.०२%), होडांई मोटर्स (२.६२%), मिंडा कॉर्पोरेशन (२.६१%), मारूती सुझुकी (२.५०%), इन्ड्युरन्स टेक (२.२६%), जीएम डीसी (२.२०%), सीएट (२.४७%), जेएम फायनांशियल (१.३७%), एसबीएफसी फायनान्स (१.७१%), एम अँड एम (१.५६%), आयशर मोटर्स (१.४२%), हिताची एनर्जी (१.२१%), टाटा मोटर्स (१.१८%), टीव्हीएस मोटर्स (१.१४%), साई लाईफ (१.०३%),टाटा स्टी ल (०.७२%) समभागात झाली आहे.सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण नेटवेब टेक्नॉलॉजी (४.१२%), अदानी टोटल गॅस (४.०१%), अदानी पॉवर (३.५५%), एमफसीस (२.६३%),गॉडफ्रे फिलिप्स (२.४०%), अदानी ग्रीन (२.१०%),अदानी एनर्जी (२.०४ %), इं डिया सिमेंट (१.९६%), एससीआय (१.८६%), एलटी फूडस (१.८५%), बीएसई (१.७३%), अल्ट्राटेक सिमेंट (१.५९%), अनंत राज (१.५१%), टीबीओ टेक (१.४८%), निवा बुपा हेल्थ (१.४१%), कॅनरा बँक (१.४१%), ट्रायडंट (१.२९%), भेल (१.२४%),सीडीएसएल (१.२३%) समभागात झाली आहे.
सुरवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की, '२०२४ च्या सप्टेंबरच्या शिखरानंतर बाजारावर येणारा मोठा ताण म्हणजे सततचा ए फआयआय विक्रीचा परिणाम आहे, जो भारतातील उच्च मूल्यांकन आणि इतरत्र आकर्षक मूल्यांकनांमुळे होत आहे. २०२४ मध्ये एफआयआयंनी १२१२१० कोटी रुपयांच्या इक्विटी विकल्या आणि यावर्षी आतापर्यंत, एफआयआयंनी एक्सचेंजेसद्वारे १७९२०० कोटी रुपयांच्या इक्विटी विकल्या आहेत. भारत आणि इतर बाजारपेठांमधील उच्च मूल्यांकनातील फरकामुळे एफआयआयना भारतातून इतर बाजारपेठांमध्ये पैसे हलवता आले आहेत आणि त्यातून नफा मिळवता आला आहे.भारताच्या कॉर्पोरेट उत्पन्नात सुधारणा हो ऊ लागल्यावर परिस्थिती बदलेल. सणासुदीच्या हंगामात कॉर्पोरेट उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल्सच्या बुकिंगमध्ये आधीच तीव्र वाढ झाल्याचे वृत्त आहे.'
सुरूवातीच्या कलावर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, गिफ्ट नि फ्टी निफ्टी ५० मध्ये ४९ अंकांची किरकोळ घसरण दर्शवित आहे. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत, जरी सततची अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत.निफ्टी निर्देशांक २५१५० पा तळीच्या वर राहण्यात यशस्वी झाला, मागील सत्रात तो २५२०२.३५ वर बंद झाला. वरच्या बाजूस, २५३३० पातळीवर तात्काळ प्रतिकार दिसून येतो, त्यानंतर २५४०० आणि २५५०० पातळीवर... नकारात्मक बाजूस, २५१५० आणि २५००० पातळीवर आधार आहे, तर २४९०० पातळीच्या खाली ब्रेकडाउनमुळे अतिरिक्त घसरणीचा दबाव निर्माण होऊ शकतो.बँक निफ्टीने देखील लवचिकता दर्शविली आहे, ५५२०० पातळीच्या वर टिकून राहिल्यास. जर खरेदीचा वेग कायम राहिला आणि निर्देशांक निर्णायकपणे ५५५०० ओ लांडला तर तो ५५७५० आणि ५६००० पातळीच्या दिशेने मार्ग मोकळा करू शकतो. नकारात्मक बाजू म्हणजे, तात्काळ आधार (Immediate Support)५५००० पातळीवर आहे आणि या पातळीपेक्षा कमी राहिल्यास नवीन विक्रीचा दबाव येऊ शकतो, ज्याचे सं भाव्य लक्ष्य ५४८३० आणि ५४५०० पातळी आहे.संस्थात्मक प्रवाहाच्या आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २२ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची खरेदीची मालिका थांबवली, २९१० कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) त्यांची खरेदी सुरू ठेवली, त्याच दिवशी २५८२ कोटी किमतीच्या इक्विटीज खरेदी केल्या.
वाढत्या अस्थिरतेची आणि मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांना सावधगिरीने 'बाय-ऑन-डिप्स' दृष्टिकोन राखण्याचा सल्ला दिला जातो.जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि मागचे स्टॉप-लॉस कडक ठेवणे शि फारसित आहे. निफ्टी २५०० पातळीच्या वर टिकला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक ट्रेंड सावधपणे तेजीत असताना, सध्याच्या बाजारातील वातावरणात नेव्हिगेट करण्यासाठी प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक घडामोडींचे बारका ईने निरीक्षण करणे महत्त्वाचे असेल.'
सुरूवातीच्या बाजारातील पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल राखल्याप्रमाणे, जवळच्या कालावधीतील अपट्रेंडची पुनर्संचयितता (Resumption of near t erm uptrend) २५२००-२५००० क्षेत्राच्या पलीकडे घसरण होते की नाही यावर अवलंबून असेल. २५२३८ पातळीच्या वर असल्यास सुरुवातीच्या हालचाली सकारात्मक पूर्वाग्रह ठेवू शकतात, परंतु गती आकर्षित करण्यासाठी २५२७८/३३५ क्षेत्राच्या वर थेट वाढ आवश्यक अ सेल. असे म्हटले जात आहे की, चालू डाउन मूव्हसाठी आदर्श विश्रांती बिंदू २४८८०-८०० असल्याचे दिसून येते.'
आजची बाजारातील एकूणच स्थिती पाहता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आज निर्देशांकातील पातळी ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतील. तरीही गुंतवणूकदारांनी सावधतेसह आपली पोझिशन होल्ड केल्यास बाजारात घरगुती गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायम राहिल त्यामुळे एफपीआयमुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते.