अतिवृष्टीमुळे गोदामाईला पूर

नागरिकांना सावधानतेचा इशारा


नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच गंगापूरसह पुनंद आणि चणकापूर धरणातून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी गोदावरीला पूर आला असून सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी आले आहे.


प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणात मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ४८ दलघफू इतक्या पूर पाण्याची आवक झाली. विसर्गामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवार पाठोपाठ मंगळवारीही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला. शहरात मध्यम सरींचा हलका वर्षाव झाला; मात्र जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ग्रामीण भागात संततधार सुरू राहिल्यामुळे धरणांची पातळी वाढत आहे. गंगापूर समूहातील कश्यपी, गौतमी-गोदावरी ही धरणेही शंभर टक्के भरल्यामुळे या धरणांमधूनही विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात येत आहे. यामुळे गंगापूरमधून विसर्गात मोठी वाढ केली जात आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. रामकुंडात दुपारी ३ वाजता ७,२०४ क्युसेक इतके पाणी वाहत होते. रात्री ८ वाजता १५ हजार ७७६ क्युसेक इतके पाणी गंगापूर धरणातून विसर्ग केल्याने गोदावरीला पूर आला आहे.



मालेगावला पावसाने झोडपले


मालेगाव शहर व तालुक्यात घटस्थापनेच्या दिवशी पावसाने जोरदार आगमन करीत परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शहरात गेल्या २४ तासांत पडलेल्या ४८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चणकापूर व पुनंद धरणातील जलस्तर वाढत असल्यामुळे चणकापूरमधून १७९७७ क्युसेकने गिरणा नदीपात्रात तर अर्जुनसागर (पुनंद) धरणातून ६८०० क्युसेकने पुनंद नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मनमाड तसेच येवला तालुक्यातही पाऊस सुरू आहे.

Comments
Add Comment

येसूबाई' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुळजापुरात

धाराशिव : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता

बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमधील एक कपडा कारखाना आणि केमिकल गोदामात भीषण आग लागली. ही घटना मीरपूरच्या रूपनगर भागातील आहे. या

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या