नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेकरिता १ ऑक्टोबरपर्यंत बेस्टतर्फे जादा बससेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील 'महालक्ष्मी यात्रा' या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. दरवर्षी महालक्ष्मी यात्रेदरम्यान महालक्ष्मीच्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईच्या उपनगरातून तसेच भायखाळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून 'महालक्ष्मी मंदिर' दरम्यान विशेष बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येते. शहराच्या विविध भागांमधून महालक्ष्मी मंदिर मार्गे प्रवर्तित होणाऱ्या विद्यमान बस मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येते. महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी मोठ्या प्रनाणावर भायखळा स्थानक व महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथे उपनगरीय रेल्वेने येऊन तेथून उपक्रमाच्या बसगाड्यांचा लाभ घेतात.


या वर्षी देखील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोबीसाठी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बेस्ट उपक्रमातर्फे बसमार्गावर दररोज २५ अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहे.


प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरीता गर्दीच्यावेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वेस्थानक मार्गे नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांच्या कालावधीत विशेष बससेवा मोठ्या प्रमाणात चालविण्यात येणार आहेत. तरी महालक्ष्मी मात्रे दरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध असलेल्या विशेष बससेवेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



त्या पुढीलप्रमाणे-


१. ए-३७ जे मेहता मार्ग ते कुर्ला स्थानक [ पश्चिम ]
२. ५७ वाळकेश्वर ते प्र. ठाकरे उद्यान (शिवडी)
३. ए-६३ भायखळा स्थानक (प) ते बीचकॅन्डी रुग्णालय
४. ७७ भायखळा स्थानक (प) ते बीचकॅन्डी रुग्णालय
५. ए-७७ जादा संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते
ग्रीयकॅन्डी रुग्णालय
६. ८३ कुलाबा बसस्थानक ते सांताक्रुझ आगार
७. १५१ वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
८. प-१३२ मुंबई सेंट्रल आगार ते ईलेक्ट्रीक हाऊस
९. ए-३५७ मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगार
१०.विशेष प्र. ठाकरे उद्यान (शिवडी) ते
महालक्ष्मी मंदिर

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती