Muhurat Trading 2025 : यंदा 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या वेळेत बदल; दुपारीच होणार खरेदी-विक्री!

मुंबई: दिवाळी निमित्त भारतीय शेअर बाजारातील सर्वात महत्त्वाच्या 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्राचा यंदाचा वेळ बदलण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, यंदा २१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणारे विशेष सत्र सायंकाळी ऐवजी दुपारी आयोजित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी, २०२४ मध्ये हे सत्र सायंकाळी ६:०० वाजता सुरू झाले होते, मात्र यंदा वेळेत बदल करण्यात आला आहे.



मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक


यंदाचे 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्र २१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केले आहे.


प्री-ओपनिंग सत्र: दुपारी १:३० वाजता सुरू होईल.


बाजाराची सुरुवात: दुपारी १:४५ वाजता.


बाजाराचे बंद होणे: दुपारी २:४५ वाजता.



मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व


'मुहूर्त ट्रेडिंग' हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे. भारतीय पंचांगानुसार दिवाळी पाडव्यापासून हिंदूंचे नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. या शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक समृद्धी आणि चांगल्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाते.


मुंबई शेअर बाजार (BSE) ने १९५७ पासून या परंपरेची सुरुवात केली, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर १९९२ पासून हे सत्र सुरू झाले. या एका तासाच्या विशेष सत्रात अनेक गुंतवणूकदार आपल्या नव्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करतात. यंदा हा ऐतिहासिक सोहळा दुपारीच पार पडणार आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबर Retail Sales: FADA संस्थेकडून ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी जाहीर! वाहन विक्रीत विक्रमी वाढ 'ही' आहे आकडेवारी

मोहित सोमण: फाडाकडून (Federation of Automobile Dealers Association FADA)ऑक्टोबर २५ आणि ४२ दिवसांच्या उत्सव कालावधीतील ऑटोमोबाईल क्षेत्रातील

Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात जागतिक पडझडीचे परिणाम कायम आज नफा बुकिंग होणार? सेन्सेक्स ५४३.२७ व निफ्टी २५१.६५ अंकांनी घसरला

आयटी रिअल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी घसरण

नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती

नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

पंतप्रधान मोदींचा 'जंगलराज'वरून थेट हल्ला

राजदचे १५ वर्ष म्हणजे 'अंधारयुग'!  अररिया : बिहारमध्ये मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय