प्रतिनिधी:आरबीआयने आपल्या नव्या Weekly Statistical Supplement या माहिती पत्रिकेत परकीय चलनासाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, परकीय चलन (Foreign Exchange Reserves) मध्ये या आठवड्यात ४.६९८ अब्ज युएस डॉलरने वाढले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत हा साठा वाढल्याने एकूण साठा ७०२.९६६ अब्ज डॉलरवर पोहोचला असल्याचे बुलेटिनमधल्या माहितीत स्पष्ट झाले. त्यामुळे प्रथमच हा ७०० अब्ज डॉलरचा आकडा सरकारच्या विदेशी तिजोरीने पूर्ण केला आहे.याच मा हितीनुसार, भारताची विदेशी मुद्रा संकलनात (Foreign Exchange Reserves Collection) मध्ये सर्वाधिक वाढीचा मुख्य घटक म्हणजे एफसीए (Foreign Currency Assets FCA) आहे.एकूण संकलनातील एफसीए वाटा ५८७.०१४ अब्ज डॉलर आहे जे मा गील तिमाहीतील तुलनेत २.५३७ अब्ज डॉलरने वाढले.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने आपल्या विदेशी मुद्रेत ५८ अब्ज डॉलरची वाढ केली होती. जी यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७१ अब्ज डॉलर होती. अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विदेशी चलन मुद्रेत २० अब्ज डॉलरची वाढ झाली होती.आता आर्थिक २०२५ पर्यंत ही वाढ ५६ अब्ज डॉलरवर झाली आहे. आरबीआयच्याच अधिकृत माहितीप्रमाणे, सोने साठा (Gold Reserves) हा ९२.४१९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.यापूर्वी झालेल्या वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीतील निष्कर्षा वर भाष्य करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले होते की, ' येणाऱ्या ११ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेल इतका मुबलक सोन्याचा साठा देशाकडे आहे ' असे म्हटले. २०२४ मध्ये रिझर्व्ह २० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढली.२०२५ मध्ये आतापर्यंत, परकीय चलन साठ्यात सुमारे ५३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते.
परकीय चलन साठा किंवा परकीय चलन साठा ही एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे किंवा चलन प्राधिकरणाकडे असलेली मालमत्ता असते, प्रामुख्याने अमेरिकन डॉलरसारख्या राखीव चलनांमध्ये, ज्यांचे लहान भाग युरो, जपानी येन आणि पाउंड स्टर्लिंगमध्ये असतात.रुपयाचे प्रचंड अवमूल्यन (Devaluation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक अनेकदा तरलता व्यवस्थापित करून हस्तक्षेप करते, ज्यामध्ये डॉलर्स विकणे समाविष्ट आहे. जेव्हा रुपया मजबूत असतो तेव्हा रिझर्व्ह बँक धोरणात्मकपणे डॉलर्स आरबीआय खरेदी करते आणि जेव्हा तो कमकुवत होतो तेव्हा आरबीआय विदेशी चलनाची विक्री करते.