Gold Silver Rate: जागतिक पातळीवर सोन्याचा व चांदीचा नवा उच्चांक, चांदीत १४ वर्षातील सर्वाधिक वाढ 'या' कारणामुळे वादळ

मोहित सोमण: फेडरल रिझर्व्ह व्याजदरात मागील आठवड्यातील कपात व जागतिक भूराजकीय परिस्थितीचा दबाव व फेडच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात सोन्यातील ईटीएफ (Exchange Traded Fund) मध्ये वाढलेल्या स्पॉट बेटिंग या एकत्रित कारणांमुळे जागतिक पातळीवर सोने विक्रमी किंमतीने महागले आहे. 'गुडरिटर्न्स या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९२ रूपये,२२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपयांनी वाढ झा ली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११३०७ रूपये, २२ कॅरेटसाठी १०३६५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८४८१ रूपयांवर गेले आहेत.माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९२० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी ११३०७० रूपये, २२ कॅरेटसाठी १०३६५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४८१० रूपयांवर गेली आहे. भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११३७८, २२ कॅरेटसाठी १०४३०, १८ कॅरेटसाठी ८६४० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळ पर्यंत १.५०% वाढ झाल्याने दरपातळी १११४९५ रूपयांवर पोहोचली.


जागतिक स्तरावरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४२% वाढ झाली आहे. तर जागतिक पातळीवरील सोन्याचा मानक (Standard) दर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.१०% वाढ झाल्याने दरपात ळी प्रति डॉलर ३७२४ औंसवर गेली आहे. याशिवाय या आठवड्यात युएस बाजारातील महागाईची आकडेवारीही अपेक्षित असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात आपली गुंतवणूक होल्ड केली आहे. ज्यामुळे मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ईटीएफमधील मा गणीत वाढ झाली.


आज सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला होता. सत्राच्या सुरुवातीला $३७२६.१९ चा नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, स्पॉट गोल्ड १.१% वाढून $३७२३.७१ प्रति औंस झाला. डिसेंबर डिलिव्हरी साठी यूएस गोल्ड फ्युचर्स 1.4% वाढून $३७५८.४० वर पोहोचला. युएस बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात अनेक फेडरल रिझर्व्ह अधिकारी बोलणार आहेत अध्यक्ष जेरोम पॉवेल मंगळवारी भाष्य करणार आहेत, कारण गुंतवणूकदार चलनविष यक धोरणाच्या भविष्यातील दिशेबद्दल त्यांच्या भाष्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.याच कारणांमुळे ही वाढ होत आहे.पुढील दर कपातीच्या गतीबद्दल संकेतांसाठी शुक्रवारी यूएस कोर वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) किंमत डेटाच्या प्रकाशनावर बाजाराचे लक्ष आहे. बुधवारी, फेडने डिसेंबरनंतर पहिली दर कपात केली, दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केले आणि अधिक सुलभतेसाठी कवाडे खुली केली होती.फेडच्या पसंतीच्या महागाई गेजसह या आठवड्यात अनेक प्रमुख अ मेरिकन आर्थिक वाचनांपूर्वी बाजार बुलियनकडे पक्षपाती राहिले.परंतु डॉलरमधील काही लवचिकतेमुळे सोन्याचा विक्रमी उच्चांक कायम राहिला, जो गेल्या साडेतीन वर्षांतील सर्वात कमकुवत पातळीवरून सावरला.स्पॉट गोल्ड ०.३% वाढून $३,६९७.७० प्रति औंस झाला, तर सोन्याचा फ्युचर्स ०.७% वाढून $३,७३३.१०/औंस झाला. गेल्या आठवड्यात स्पॉट किमती $३,७०७.७०/औंसच्या शिखरावर पोहोचल्या.


चांदीतही वादळी वाढ !


सोन्यासह आज चांदीतही वादळी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३ रूपये वाढ झाली असून प्रति किलो दरात ३००० रूपयांनी वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १३८ व प्रति किलो दर १३८००० रूपयांवर गेले आहेत. आज दिवसभरातच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. फेड व्याजदरात कपातीसह डॉलरच्या घसरणीमुळे चांदीवर दबाव पातळी निर्माण झाली. वाढलेल्या ईपीएफ बेटिंगसह वाढलेल्या औद्योगिक मागणीमुळे चांदीही महागली. जागतिक पातळीवर १४ वर्षातील सर्वाधिक वाढीवर चांदी प्रति औंस ४४ डॉलरवर सकाळी पोहोचली होती. २०११ नंतरची ही सगळ्यात मोठी वाढ जागतिक बाजारपेठेत मानली जाते.


सोमवारी अमेरिकन डॉलर निर्देशांक घसरला, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा दिसून येत आहे, गुंतवणूकदार चलनविषयक धोरणांवरील संकेतांसाठी फेड अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. युएस बाजारातील तज्ञांच्या मते, किरकोळ व्यापारी जोखीम रोखण्यासाठी चांदीला कमी मूल्यांकित मालमत्ता म्हणून वळवत आहेत, सोन्याच्या तुलनेत पांढऱ्या धातूला अधिक अनुकूल पर्याय म्हणून पाहिले जात आहे, जो नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे.चांदी १.६% ने वाढून $४३.७९ वर पोहोचली, जी सप्टेंबर २०११ नंतरची सर्वाधिक आहे. ही किंमत $४३.०९ च्या सुरुवातीच्या पातळीपासून $४३.०३ च्या नीचांकी पातळीपर्यंत पोहोचली. शुक्रवारी झालेल्या सेटलमेंटमध्ये, पांढऱ्या धातूच्या मजबूत मागणीमुळे, चांदीने सलग दुसऱ्या दिवशी ३.४% ने वाढ केली. गेल्या आठवड्यात, चांदीने सलग पाचव्या आठवड्यात २.१५% ने वाढ केली.


संध्याकाळपर्यंत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.०३% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.९२% वाढ झाल्याने दरपातळी १३२३३२ रूपयांवर पोहोचली. आज भारतातील सराफा बाजा रात चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १४८००, प्रति किलो दर १४८००० रुपयांवर पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

GST 2.0 सुधारणा लागू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र

नवी दिल्ली : भारतात GST 2.0 सुधारणा सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी सुधारणा लागू

सचिन आला आणि शिवाजी पार्कमधलं वातावरण एकदम बदललं

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन भारतरत्न

जागतिक गोंधळात सुखावणारी बातमी : ५० टक्क्यांहून अधिक भारतीय देशी ब्रँड खरेदीला प्राधान्य देतात 'या' आकडेवारीत स्पष्ट

रुकाम कॅपिटलच्या ‘नवीन भारताच्या आकांक्षा’ अहवालात उघडकीस पहिल्या श्रेणीतील शहरांत आर्थिक प्रौढत्व दिसून

जीएसटी कपात झाली 'असे' झाल्यास कर्जाचे हप्ते स्वस्त होणार? एसबीआय अहवालात महत्वाची माहिती समोर

प्रतिनिधी:जीएसटी कपात झाली पण आता एसबीआयने दिलेल्या नव्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये आरबीआय रेपो दरात २५ बेसिस

Pakistan AirStrike : मोठी बातमी, पाकिस्तानच्या J-१७ फायटर जेटने उडवली आपलीच घरं, अनेक जण ठार

खैबर पख्तूनख्वा : दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी उड्डाण केलेल्या पाकिस्तान एअरफोर्सने सोमवारी सकाळी प्रचंड

सलग तिसऱ्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा ४.७ अब्ज डॉलरने वाढला 'या' विक्रमी पातळीवर

प्रतिनिधी:आरबीआयने आपल्या नव्या Weekly Statistical Supplement या माहिती पत्रिकेत परकीय चलनासाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या