अकरावी प्रवेशाची शेवटची संधी


मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आता सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून अकरावीच्या अर्थात FYJC च्या प्रवेशाची अंतिम फेरी सुरू होत आहे. राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल. यात फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, पण जुलैमधील फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


यंदा राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. उर्वरित नोंदणी केलेल्या पण कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. या संधीचा वापर करुन संबंधितांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.


अंतिम फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागा जाहीर करणे, कोट्याच्या जागा जाहीर करणे, प्रवेशक्षमता वाढवणे आदी प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी केल्या जातील. यानंतर २२ आणि २३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, प्राधान्यक्रम देणे, आदी गोष्टींसाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, ती महाविद्यालये २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी बोलावतील. महत्त्वाचे म्हणजे २५ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.


Comments
Add Comment

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

नवरात्रोत्सवात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण मुंबईत सणाची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर मंडप,

मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम

समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार  मुंबई: मुंबईच्या समुद्र

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही.