अमेरिकेत नोकरीचे स्वप्न आता स्वप्नच राहणार, H-1B व्हिसाचे नियम केले कठोर

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत, देशाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न याधीच केला आहे, त्यावर भारत पर्यायी व्यवस्था राबवत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे,  त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमातही काही मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे केवळ भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला त्याचा हादरा बसणार आहे.  तसेच यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता स्वप्न राहण्याची चिन्हे आहेत.



H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय


 अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात. आता H-1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावी लागणार आहेत. भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता थेट नियमात बदल करण्यात आला आहे.



H-1B व्हिसा धारकांसाठी काय आहेत नवे नियम?


H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत गैर-स्थलांतरित कामगार म्हणून थेट प्रवेश मिळू शकणार नाही. आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $ १००,१०० म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावे लागेल. नवीन $१००,१०० शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल. यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील.


८ लाख रुपयांचे शुल्क भरण्यासाठी मोठ्या कंपन्यांना फार काही अडचण नक्कीच नसणार आहे. मात्र, छोट्या कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी समस्या बनेल.


H-1B व्हिसाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप ट्रम्प सरकारचा असून, त्यामुळेच त्याच्या नियमात बदल करण्यात आला  असल्याचे म्हंटले जातआहे.   अमेरिकेत काम करणारी जास्त करून भारतीय लोक याच व्हिसावर गेलेले आहेत. मात्र, आता नवीन H-1B व्हिसा मिळवणे आणि त्यावर अमेरिकेत जाऊन काम करणे म्हणजे मोठे आव्हान आहे.

Comments
Add Comment

मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल तेजवानी पुन्हा चर्चेत! बोपोडी येथे जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआरआय दाखल

मुंबई: ‘बोपोडीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराशी माझा काहीच संबंध नसताना मला त्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे

जैश-ए-मोहम्मदचे व्हाईट कॉलर नेटवर्क उद्ध्वस्त, २९२३ किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त

नवी दिल्ली : सरकार आणि सुरक्षा संस्थांच्या सतर्कतेमुळे हल्ले करण्यास दीर्घकाळ असमर्थता दर्शविल्याने निराश

दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी,

'नितीश' पर्व कायम? बिहारमध्ये NDA चा 'क्लीन स्वीप', एक्झिट पोल्सचा स्पष्ट अंदाज!

तेजस्वी यादवांच्या 'महागठबंधन'ला मोठा झटका; प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा प्रभाव नगण्य पाटणा : संपूर्ण

प्रभाग आरक्षणात दिग्गजांचे प्रभाग गेले; मुंबईत रवीराजा, विशाखा राऊत, नील सोमय्या, सदा परब, आसिफ झकेरियांना यांना फटका

अनेकांचे प्रभाग कायम राखले मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी