केडीएमसीच्या अत्रे नाट्यगृहात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री

केडीएमसीच्या अत्रे नाट्यगृहात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री


कारवाई करण्याची नागरिकांची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) :कल्याण, प. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार नागरिकांनी गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आणला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे अत्रे रंग मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित होत असून महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. काल एका गुजराती नाटकाच्या मध्यंतरावेळी हा प्रकार घडला. एक जण कोल्ड्रिंक घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले असता त्या ठिकाणी एक्सपायरी डेट संपलेल्या कोल्ड्रिंकची बाटली देण्यात आली अशी तक्रार संबंधिताने केली आहे. फ्रिजमध्येदेखील असलेल्या बॉटलची देखील एक्सपायरी डेट संपलेली होती असे त्याने सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला.


तर याबाबत अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांना विचारणा केली असता, ''ही घटना कळताच आपण येथे आलो. काय झाले याची माहिती घेऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा प्रकार वरिष्ठांना कळवला आहे. पोलिसांनादेखील याबाबत तक्रार दिली असून पोलीसांनी जवाब नोंदवला आहे. नाट्यगृहातील उपहार गृहाचा ठेका ५ वर्षांसाठी दिला जातो. हा ठेका देताना अटी-शर्ती असतात, त्यांचे पालन करून उपहारगृह चालवायचे असते. या प्रकरणात संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल'' असे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे