जीएसटी दर कपातीने ४८ हजार कोटींचे नुकसान?

जीएसटी दर कपातीने ४८ हजार कोटींचे नुकसान?


नवी दिल्ली : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण केल्याने ग्राहकांवरील करभार कमी होणार असला, तरी त्यातून कराचे संकलन देखील घटणार आहे. याचा सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण दीर्घकाळासाठी पडण्याची शक्यता कमी आहे, असा निर्वाळा ‘क्रिसिल’ने शुक्रवारी दिला.
जीएसटी दर सुसूत्रीकरणामुळे सरकारला अल्पावधीसाठी वार्षिक ४८,००० कोटी रुपयांचे निव्वळ नुकसान होण्याचा अंदाज ‘क्रिसिल’च्या अहवालाने वर्तविला आहे. संकलनाच्या तुलनेत नुकसान मोठे नसल्याचे व तेही अल्पकाळासाठीच राहण्याचे अहवालाने म्हटले आहे. मागील आर्थिक वर्षात जीएसटी संकलन १०.६ लाख कोटी रुपये झाले होते.
जीएसटी परिषदेने शून्य, ५ टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के अशी चारस्तरीय रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारणामुळे उत्पादने व सेवांच्या किमती कमी होतील. वस्तू स्वस्त झाल्याने ग्राहकांच्या हाती शिल्लक राहणारा अधिक पैसा हा अर्थव्यवस्थेत भर घालणारा ठरेल, असा अहवालाचा अंदाज आहे.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा