‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.


Comments
Add Comment

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

नवरात्रोत्सवात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण मुंबईत सणाची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर मंडप,

मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम

समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार  मुंबई: मुंबईच्या समुद्र