बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांनी नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड घराबाहेरच स्वत:वर गोळी झाडून घेतली, या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
गोविंद बर्गे यांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले होते. कला केंद्रात असलेली नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात बर्गे पूर्णपणे वेडे झाले होते. तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होते.
गोविंद बर्गे यांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, प्लॉट, बुलेट, आयफोन, शेतजमीन एवढंच नाही तर घर देखील बांधून दिले होते. मात्र तरीही पुजा समाधानी नव्हती. तिची नजर ही गोविंद बर्गे यांच्या गेवराईच्या बंगल्यावर होती. हा बंगला माझ्या नावावर करून दे अशी मागणी तिने गोविंद बर्गे यांच्याकडे केली होती. मात्र गोविंद बर्गे हे तिला गेवराईचा बंगला देण्यास तयार नव्हते, त्यासाठी ती सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकत होती, याच दबावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.