Tax Collection: निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ९.१८% वाढत १०.८२ लाख कोटी रुपयांवर

प्रतिनिधी:कॉर्पोरेट कंपन्यांकडून जास्त आगाऊ कर (Advance Tax) वसूल झाल्यामुळे आणि परतफेडीची (Returns) गती मंदावल्याने या आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर (Nominal Direct Tax Collection) संकलन ९.१८% वाढत १०.८२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तसेच सरकारी आकडेवारीनुसार,१ एप्रिल ते १७ सप्टेंबर दरम्यान परतफेड जारी करण्याचे प्रमाण २४% घसरत १.६१ लाख कोटी रुपयांवर आले आहे.आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत, कॉर्पोरेट आगा ऊ कर संकलन (Corporate Advance Tax Collection) ६.११% वाढून ३.५२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तथापि, बिगर-कॉर्पोरेट आगाऊ कर वसूल ७.३०% घसरून ९६७८४ कोटी रुपयांवर आले आहे. १ एप्रिल ते १७ सप्टेंबर दरम्यान, निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन ४.७२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, जे २०२४ मध्ये याच कालावधीत ४.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


बिगर-कॉर्पोरेट कर, ज्यामध्ये व्यक्ती (Individual Person) आणि एचयूएफ (Hindu Undivided Family HUF) समाविष्ट आहेत त्या प्रवर्गात आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे ५.८४ लाख कोटी रुपयांवर कर जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५.१३ लाख कोटी रुपयांपेक्षा यंदाचे संकलन जास्त झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.या आर्थिक वर्षात आतापर्यंत सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) संकलन २६३०६ कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या करापेक्षा इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २६ १५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान विना बिगर-कॉर्पोरेट कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर ७.३०% घसरण झाली आहे.


वैयक्तिक उत्पन्न कर आणि कॉर्पोरेट कर यांचा समावेश असलेल्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.१८% वाढ होऊन ते या आर्थिक वर्षात १७ सप्टेंबरपर्यंत १०.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी संकलन ९.९१ लाख कोटी रुपयांपे क्षा जास्त होते.परतफेड समायोजित करण्यापूर्वी एकूण प्रत्यक्ष कर संकलन या आर्थिक वर्षात १७ सप्टेंबरपर्यंत १२.४३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते,जे मागील वर्षीच्या तुलनेत ३.३९ टक्के वाढ आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) सरकारने २५.२० लाख को टी रुपयांचा प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १२.७ टक्क्यांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष २६ मध्ये एसटीटीमधून ७८००० कोटी रुपये गोळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे