Nagpur Flyover: चक्क घराच्या बाल्कनीतून गेला उड्डाणपूल, घरमालकालाही काहीच हरकत नाही!

नागपूर: नागपूरमधील एका बांधकामाधीन उड्डाणपुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूलाचा रोटरी बीम एका निवासी इमारतीच्या बाल्कनीतून आत गेल्याचे दिसून येत आहे. अजब गोष्ट म्हणजे, घर मालकाला देखील या उड्डाणपुलाचा कुठलाच त्रास नसल्याचे दिसून आले! मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उड्डाणपूल इमारतीच्या बाल्कनीतून गेल्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि नागपूर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



कुठे बांधला जात आहे हा उड्डाणपूल?


मुळात हा उड्डाणपुल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे अशोक नगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या इंदूर-दिघोरी कॉरिडॉरचा एक भाग आहे. नागपूर शहरातील ९९८ कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल आता वादात सापडला आहे. कारण या उड्डाणपूलाचा बीम चक्क निवासी इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे. याबद्दल, एनएचएआयने या उड्डाण पुलाच्या मार्गावर आलेल्या बाल्कनीला अतिक्रमण बांधकाम असल्याचे म्हटले आहे.



अतिक्रमण बांधकाम असल्याचा दावा



या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, एनएचएआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रश्नातील बाल्कनी अतिक्रमित क्षेत्रात येते. अधिकाऱ्याने सांगितले की, "ही बाल्कनी अतिक्रमणाचा एक भाग आहे आणि आम्ही ते हटविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला (एनएमसी) आधीच पत्र लिहिले आहे." तसेच हे अतिक्रमण लवकरच हटवले जाईल अशी देखील माहिती त्यांनी दिली. "उड्डाणपूल आखून दिलेल्या परिघात आणि क्षेत्रफळातच आहे. तो योग्यरित्याच बांधला जात आहे आणि त्यात कोणतीही समस्या नाही. बांधकामाच्या वेळी घर आणि उड्डाणपूल यांच्यामध्ये दीड मीटरचे अंतर होते. बाल्कनी नंतर जोडण्यात आली" असे एनएचएआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान, महापालिकेचा दावा आहे की सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती. बाल्कनी अथवा घराच्या कोणत्याही बांधकामात अतिक्रमण करण्यात आलेले नाही. ही बाल्कनी अतिक्रमणात येत नसल्याने ते तत्काळ पाडणे शक्य नाही.



घरमालकाला काहीच हरकत नाही!


विशेष म्हणजे, घरमालक प्रविण पत्रे यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना उड्डाणपूलाबाबत त्यांना काही हरकत नसल्याचं सांगितलं आहे. तसेच बांधकाम अतिक्रमीत क्षेत्रात येत असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.  उड्डाणपूल ज्या ठिकाणी वळण घेत आहे, त्याचा रोटरी बीम इमारतीच्या बाल्कनीच्या भागातून जातो, परंतु तो इमारतीला स्पर्श करत नाही. याबद्दल बोलताना घरमालक प्रवीण पत्रे म्हणतात की,  "हा बाल्कनीचा एक भाग आहे जो वापरात नाही; त्याला 'नो मॅन्स लँड' म्हणता येईल. उड्डाणपूल १४-१५ फूट उंच आहे, त्यामुळे घराला यामुळे कोणताही धोका नाही."  घरमालकाला पूलामुळे काही हरकत नसली तरी, बाल्कनीतून पूल जात असल्याने भविष्यात अपघाताचा धोका कायम राहणार असल्याची भीती आजूबाजूचे लोकं आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. 


 
Comments
Add Comment

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील