उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे, निरोगी रहाणे गरजेचे असते. आतड्याचे आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे. ते निरोगी नसेल तर अनेक आजार होतात. म्हणून यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. काहीसुद्धा खाल्लं कि ऍसिडिटी होणे, पोट बाहेर येणे यासाठी अनेक गोळ्या, सप्लिमेंट घेत असाल तर त्यापेक्षा सकस आहार घेऊन आपल्या आतड्याची काळजी घेऊ शकतो.

लिंबू पाणी प्या..

सकाळी उठल्यावर लिंबाचे पाणी प्यायलात तर रक्तातील क्षार वाढतील. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल तसेच पचनक्रिया सुधारेल.

सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आहार..

सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्याचा पांढरा भाग, फळे, नारळपाणी याचा समावेश करू शकता.

दुपारचे जेवण म्हणजे शाकाहारी थाळी..

ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीसोबत पालेभाज्या, कडधान्य, ताक, काकडी, गाजर, बीटाची कोशिंबीर याचा समावेश असेल तर आरोग्य उत्तम रहाते.

संध्याकाळचा नाश्ता तेलकट नसावा..

संध्याकाळ झाली कि चहा सोबत चटपटीत खायला मिळावं असं सर्वांना वाटतं. पण त्याऐवजी चणे, शेंगदाणे, कुरमुरे असं खाऊन भूक आणि तब्येत दोन्ही सांभाळू शकता.

रात्रीचे जेवण हलके घ्या..

रात्रीच्या जेवणात सूप, सलाड, हिरव्या भाज्या, डाळ-भात असा साधा आहार केला तर पचायला सोपे जाते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे