मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आज मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपने मुंबईतील प्रतिष्ठित डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून संपर्क कार्यक्रम सुरू करत त्यांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतली.

मंगळवारी मुंबई भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलेल्या या मोहिमेचा उद्देश मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या मते आणि मागण्या जाणून घेणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने वांद्रे पश्चिम येथील डब्बावाला भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डबा वितरणसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध प्रणाली असलेल्या मुंबईतील डब्बेवाले त्यांच्या अचूकता आणि अतुलनीय सेवेसाठी ओळखल्या जातात. मुंबईततील डबेवाले ही आवज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या उपक्रमात भाग घेणारा पहिला ग्रुप ठरला.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमीत साटम यांनी आरोग्य शिबिरानंतर डब्बावालांसोबत दुपारचे जेवणही घेतले. मी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची मते आणि सूचना ऐकल्या. डब्बावाला हे मुंबईच्या नोकर वर्गासाठी अत्यावश्यक सेवा देतात. त्यांची शिस्त आणि सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य केली गेली आहे. ही मोहीम त्यांच्यापासून सुरू होणे योग्य आहे, असे आमदार अमीत साटम म्हणाले.

साटम यांनी पुढे सांगितले की, भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य मुंबईकरांकडून अभिप्राय जमा करतील. आगामी बीएमसी निवडणुकीसाठी त्यांचा अभिप्राय आणि मते भाजपच्या जाहीरनाम्याचा भाग बनतील. आम्हाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही आमदार अमीत साटम पुढे म्हणा

Comments
Add Comment

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू