मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात गुरुवारी डॉक्टरांनी संप पुकारला असून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनने (एमएसआरडीए) या दोन संघटनाही संपावर जाणार असल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीसीएमपी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील डॉक्टरांनी दंड थोपटले आहे.राज्यातील एक लाख ८० हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहेत.