अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; भारत-अमेरिका संबंधांवर झाली चर्चा


नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली. या दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुकही केले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी भारत-अमेरिका संबंध आणि काही जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.


राष्ट्रपती ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली बातचीत सादर केली. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शानदार फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते अद्भुत काम करत आहेत. नरेंद्र रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी धन्यवाद.


पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले आणि त्यांना 'माझा मित्र' असे संबोधले. त्यांनी लिहिले की, 'माझ्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या फोन कॉल आणि हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प.'


या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेची व्यापक आणि जागतिक भागीदारी नवीन उंचीवर नेण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली. तसेच, युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचेही मोदींनी सांगितले.


हा फोन कॉल अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या भेटीही झाल्या होत्या. या फोन कॉलमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच