पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत


मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या अंतर्गत सणासुदीच्या काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तसेच बस बुकिंगवर प्रवाशांना २०% पर्यंत बचत होईल. पेटीएम ट्रॅव्हलने बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक आणि एचएसबीसी अशा प्रमुख बँकांसोबत भागीदारी केली आहे.


बँक ऑफ बडोदा कार्डधारकांना देशांतर्गत विमान बुकिंगवर १४% पर्यंत, आंतरराष्ट्रीय विमानावर १०% पर्यंत आणि बस बुकिंगवर २०% पर्यंत सवलत मिळेल. आयसीआयसीआय बँक ग्राहकांना विमान प्रवासावर १०% पर्यंत सवलत मिळेल. आरबीएल बँक ग्राहकांना देशांतर्गत विमानावर थेट १२% तर आंतरराष्ट्रीय विमानावर १०% सवलत मिळेल. एचएसबीसी कार्डधारकांना विमान प्रवा सावर १२% आणि बस बुकिंगवर १०% पर्यंत सवलत मिळेल.


विमान आणि बस व्यतिरिक्त, पेटीएम ट्रॅव्हल रेल्वे प्रवास अधिक फायदेशीर करत आहे. रेल्वे बुकिंगवर यूपीआयद्वारे पेमेंटसाठी गेटवे शुल्क शून्य आहे तसेच मोफत रद्द करण्याची सुविधा असून त्वरित पूर्ण परतावा मिळतो. प्रवाशांना लाईव्ह रनिंग स्टेटस आणि पीएनआर तपशीलांसारखी रिअल-टाइम माहिती मिळते. तसेच, टिकिट अशुअर सेवा प्रवाशांना शेजारील स्थानके किंवा लवचि कतेने प्रवास दिनांक (Flexible Travel Date) निवड यांसारख्या स्मार्ट पर्यायांद्वारे कन्फर्म तिकीट मिळविण्यात मदत करते.


पेटीएम ट्रॅव्हल आपल्या सेवांचा विस्तार करून प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात मदत करत आहे. अलीकडेच कंपनीने ट्रॅव्हल पास सादर केला आहे, जो वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांना खर्चावर ला भ, मोफत रद्दीकरण आणि प्रवास विमा देतो. निवासाच्या अधिक पर्यायांसाठी, पेटीएमने अगोडासोबत भागीदारी करून हॉटेल बुकिंग सुविधा दिली आहे, ज्यामुळे प्रवाशांना भारत आणि परदेशा तील हजारो निवास पर्याय उपलब्ध होतात. देशांतर्गत कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत करण्यासाठी फ्लाय९१ सोबतच्या सहकार्यामुळे प्रादेशिक मार्गांवर विमान प्रवास सोपा झाला आहे. आयएटीए मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट म्हणून पेटीएम ट्रॅव्हल ग्राहकांना विश्वसनीय बुकिंग अनुभव देते, ज्यात मोफत रद्दीकरण, त्वरित परतावा आणि सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्व्हेंटरीचा प्रवेश आहे.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण