मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी जाहीर केला आहे. या मार्गिका केव्हापासून बंद राहतील आणि पुनश्च सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल, याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.


एमएमआरडीएने २४६० कोटी रुपये खर्च करून उभारलेली २० किमी लांबीची चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल सेवा सुरुवातीपासूनच तोट्यात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद अपुरा मिळत असतानाच गाड्यांचे वारंवार अपघात आणि तांत्रिक बिघाडांमुळे प्रकल्पावर सातत्याने टीका होत आहे.


गेल्या महिन्यातच मोनोरेल गाड्या तीन वेळा तांत्रिक बिघाडामुळे थांबल्या. ऑगस्टमध्ये तर एकाच दिवशी दोन गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या होत्या. त्यातील एका गाडीतून ५८८ प्रवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडून सुरक्षित बाहेर काढावे लागले. २०१७ मध्येही एका गाडीला लागलेल्या आगीमुळे सेवा तब्बल नऊ महिने ठप्प होती.


वारंवारच्या या घटनांमुळे मोनोरेल प्रकल्पावर ‘पांढरा हत्ती’ असा शिक्का बसल्याची टीका सुरू आहे. अपघात आणि बिघाड हाताळण्यासाठी एमएमआरडीएकडे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नसून अग्निशमन दलावरच अवलंबून राहावे लागत असल्याचेही उघड झाले आहे. तांत्रिक अडचणींमुळे नवीन मोनोरेल रेक्स सेवेत आणण्यातही उशीर होत आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत सध्या मोनोरेल मार्गिका बंद ठेवून पुढील उपाययोजना आखण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक