मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी केली आहे. युएचटी दूधावरील जीएसटी ५ टक्के वरून 0% करण्यात आला आहे, त्यामुळे २२ सप्टेंबर २०२ पासून या दूधाची एमआरपी कमी होणार आहे. त्याशिवाय, कंपनीने काही व्हॅल्यू अ‍ॅडेड डेअरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेस्ड फूड्सच्या किमती देखील कमी करण्याचे जाहीर केले आहे. या सर्व नवीन किंमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.


मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी सांगितले, “डेअरी आणि प्रोसेस्ड अन्न उत्पादनांवरील जीएसटी कपात हा एक प्रगतीशील निर्णय आहे. यामुळे खपात वाढ होईल आणि सुरक्षित, उच्च गुणवत्तेच्या पॅकेज्ड उत्पादनांचा स्वीकार वाढेल. आमच्या ग्राहकांना 100% कर लाभ देण्यात येत आहे.”


युएचटी दूधाच्या नवीन किंमती - टोन्ड दूध (1 लिटर टेट्रा पॅक): ₹77 → ₹75, डबल टोन्ड दूध (450 मि.ली. पाउच): ₹33 → ₹32. पनीर : 200 ग्रॅम पॅक: ₹95 → ₹92, 400 ग्रॅम पॅक: ₹180 → ₹174. मलाई पनीर: ₹100 → ₹97 बटर: 500 ग्रॅम पॅक: ₹305 → ₹285, 100 ग्रॅम पॅक: ₹62 → ₹58. मिल्कशेक : 180 मि.ली. पॅक: ₹30 → ₹28. तूप – नवीन किंमती: कार्टन पॅक (1 लिटर): ₹675 → ₹645, टिन (1 लिटर): ₹750 → ₹720, पिशवी दूध (1 लिटर): ₹675 → ₹645. गायचं तूप (500 मि.ली. जार): ₹380 → ₹365, प्रीमियम गायचं तूप – गिर गाय (500 मि.ली.): ₹999 → ₹98४


मदर डेअरीने स्पष्ट केले आहे की फुल क्रीम, टोन्ड मिल्क आणि गायचं दूध जे पिशवीमध्ये विकले जातात, त्यांच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही. या उत्पादनांवर पूर्वीपासूनच जीएसटी लागू नव्हता, आणि पुढेही लागणार नाही, त्यामुळे त्यांच्या किंमती स्थिरच राहतील.


अमूलने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, “22 सप्टेंबरपासून पिशवी दूधाच्या किमतीत कोणतीही कपात होणार नाही कारण या उत्पादनांवर आधीपासूनच शून्य जीएसटी लागू आहे.” जीसिएमएमएफ (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) चे एमडी जयेन मेहता यांनी सांगितले की, “ताज्या पाउच दूधाच्या किंमतीत बदल प्रस्तावित नाही कारण जीएसटी मध्ये कोणतीही कपात झाली नाही.”


२२ सप्टेंबरपासून मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध, घी, मक्खन, पनीर आणि इतर काही उत्पादनं स्वस्त मिळतील. मात्र, दैनिक वापरातलं पिशवी दूध जसं आहे तसंच राहील. त्याच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन