काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल


मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पण ही मोनोरेल तांत्रिक समस्यांमुळे एका महिन्यात तीन वेळा बंद पडली. आधीच मोनोरेल म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे. उत्पन्नाच्या तुलनेच खर्च अफाट अशी परिस्थिती आहे. यात महिन्याभरात तीन वेळा बंद पडल्यामुळे मोनोरेलच्या व्यावसायिक उपयोगितेविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.


म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल १९ ऑगस्ट २०२५ रोजी बंद पडली. विजेचा पुरवठा खंडीत झाला आणि सेवा ठप्प झाली. डब्यातील वीज पुरवठाही खंडीत झाला. यामुळे दिवे बंद झाले आणि एसी ठप्प झाले. ऐन पावसात मोनोत प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांना मोनोरेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या महितीनुसार शेकडो प्रवाशांना त्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोनोरेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. यानंतर २१ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटांसाठी मोनोरेल बंद पडली होती. आता १५ सप्टेंबर २०२५ रोजी परत मोनोरेल बंद पडली. ही मोनोरेल बंद पडण्याची महिन्याभरातली तिसरी वेळ आहे.


सलग अनेक तास पाऊस पडत असल्यामुळे मोनोरेलच्या यंत्रणेत बिघाड झाला. वडाळ्याजवळ मोनोरेल बंद पडली. पण यावेळी फक्त एका मार्गावरील मोनोरेल बंद पडली. यामुळे प्रवाशांना दुसऱ्या मार्गावरुन प्रवास करत असलेल्या मोनोरेलमध्ये स्थलांतरित करुन जवळच्या स्टेशनवर उरवण्यात आले. यावेळी १९ ऑगस्टच्या तुलनेत समस्या लवकर सुटली. पण महिन्याभरात तिसऱ्यांदा मोनोरेल मोठ्या बिघाडामुळे बंद पडल्याची दखल अनेकांनी घेतली. वीज पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून त्याची चौकशी केली जात आहे, अशी माहिती मोनो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. सुदैवाने अडीच तासांनंतर मोनोरेल पुन्हा सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.