महाराष्ट्राचा डंका!
नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. यामध्ये पाचगणीचे डेक्कन ट्रॅप्स, महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि आंध्र प्रदेशातील तिरुमाला हिल्सच्या नावांचाही समावेश आहे. युनेस्कोमधील भारताच्या स्थायी शिष्टमंडळानुसार, ही ७ वारसा स्थळे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. यासोबतच युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्थळांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
६९ स्थळे झाली समाविष्ट
यासोबतच युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील ६९ ठिकाणांची नावे नोंदवली गेली आहेत. यामध्ये ४९ सांस्कृतिक, ३ मिश्रित आणि १७ नैसर्गिक श्रेणीतील स्थळे आहेत.