पूजा खेडकर यांच्या आईविरुद्ध गुन्हा नोंद!
वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पुणे शहर पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, मनोरमा खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २२१ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणणे, कलम २३८ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना वाचवणे तसेच कलम २६३ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेडकर कुटुंबावरील कायदेशीर संकट अधिकच गडद झालं असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रोड रेज प्रकरणाशी थेट संबंध!
नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाने आता पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला थेट मनोरमा खेडकर यांच्या घरी आणल्याची माहिती समोर आली आहे. तपासाची सूत्रे गवसल्यावर नवी मुंबई पोलिसांनी त्या घराचा शोध घेतला आणि घटनास्थळी धडक दिली. मात्र, पोलिसांचा गंभीर आरोप असा आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबाविरोधातील गुन्ह्यांचे जाळे आणखी गुंतागुंतीचे झाले असून, पुढील चौकशीत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पण ही मोनोरेल तांत्रिक ...
खेडकर कुटुंब अडचणीत! वडिलांवर गंभीर आरोप
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाभोवती वादांची मालिका वाढतच चालली आहे. यावेळी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचे नाव थेट चालकाच्या अपहरणाच्या प्रकरणाशी जोडले गेले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दिलीप खेडकर यांना अटक करण्यासाठी पथक त्यांच्या घरी पोहोचले असता, पूजाची आई मनोरमा खेडकर यांनीच त्यांना पळून जाण्यास मदत केली. या घटनेनंतर पोलिसांनी दिलीप खेडकर यांचा शोध अधिक तीव्र केला असून, त्यांना लवकरच गजाआड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पूजा खेडकर स्वतः एका मागोमाग एका वादात सापडत असताना, त्यांच्या कुटुंबियांचाही गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध आल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक स्वरूप धारण करत आहे. खेडकर कुटुंबाविरुद्ध होत असलेले हे गंभीर आरोप आणि सतत समोर येणारे नवे खुलासे यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.