९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. पण विश्वास पाटील यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


नवीन वर्ष २०२६ च्या जानेवारी महिन्यात सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार आहे. त्याच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती.


साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पानिपतकार विश्वास पाटलांचीच अध्यक्ष म्हणून वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यानुसार विश्वास पाटलांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 'साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू‌. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि
९९ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात