भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास


नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत तिने पोलंडच्या पॅरिस ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती ज्युलिया सेरेमेटाचा (Julia Szeremeta) ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून भारतासाठी स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक जिंकले.


लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जैस्मिन पहिल्या राऊंडमध्ये थोडी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले. याआधी उपांत्य फेरीत तिने व्हेनेझुएलाच्या कॅरोलिना अल्काला (Carolina Alcala) हिचा ५-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा विजय तिच्यासाठी केवळ एक पदकच नव्हता, तर भारतीय महिला बॉक्सिंगसाठी एक मोठा टप्पा होता.


याच स्पर्धेत भारताच्या नुपूर श्योराणने ८०+ किलो वजनी गटात आणि पूजा राणीने ८० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे, तर मीनाक्षी हुड्डा देखील ४८ किलो वजनी गटात पदक निश्चित करण्यात यशस्वी झाली आहे.


Comments
Add Comment

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार

भारत-न्यूझीलंड मालिकेचा निकाल इंदूरच्या ‘होळकर’वर

शुभमन गिलसाठी प्रतिष्ठेची लढाई, विजयाची परंपरा राखण्याचे आव्हान इंदूर : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२६ वर्षाची

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय