राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना' (PMMSY) च्या धर्तीवर, आता लवकरच राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' (Mukhyamantri Matsyasampada Yojana) सुरू केली जाणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. येत्या जानेवारी २०२६ पासून ही योजना सुरू होईल आणि त्यामुळे मच्छिमारांना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांच्या योजनांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.



मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा


वरळी येथे शुभम चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हे महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, "या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करत आहोत, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक कोळी बांधवाला विविध पद्धतीने लाभ मिळण्यास सुरुवात होईल."



आरोग्य शिबिरातून मच्छिमार महिलांना मदत


यावेळी बोलताना राणे यांनी शुभम चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "मी मंत्री असलो तरी तुमचा सहकारी म्हणून इथे आलो आहे. तुम्हाला माझी जिथे कुठेही गरज असेल, तिथे तुम्ही नक्की मला बोलवा. कोणीही त्रास देत असेल, म्यांव म्यांव करत असेल तर लगेच मला फोन करा. त्यांचा आवाज बंद करण्याची सगळी औषधं माझ्याकडे आहेत."


या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि शुभम चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले. ते म्हणाले की, कोळी बांधव जीवाची पर्वा न करता समुद्रात मासेमारी करतात. अनेक हालअपेष्टा त्यांना सहन करावी लागते. तसेच मच्छिमार महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या शिबिरातून त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळेल. मी स्वतः या शिबिराला भेट देऊन महिलांना होणारे त्रास आणि त्यांना लागणाऱ्या औषधांची माहिती घेतली.



राजकीय टोलेबाजी आणि पुढील वाटचाल


यावेळी राणे यांनी भाषणात राजकीय टोलेबाजीही केली. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, "जिथे जिथे भाजपचा कार्यकर्ता ताकदीने फिरेल, तिथे मतदारांना हा विश्वास दिला पाहिजे की त्यांचा विकास फक्त भाजपच करू शकतो. या मतदारसंघातून पुढील वेळी भाजपचा आमदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मी किरणजीना सांगेल आणि आमच्या सावंत आणि सगळ्या भारतीय जनता पक्षामधील सहकाऱ्यांना सांगेल जसे आमच्या कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेता, तसं थोडं या मतदार संघाच्या पण लोकांच्या आरोग्य आरोग्याची काळजी घ्या. दोन टर्म पासून बिचारे फार हैराण आहेत. इथे भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून जात नाही तोपर्यंत या लोकांची आरोग्याची काळजी आपण घेऊ. निष्क्रिय आमदार या मतदार संघाला मिळाला असल्यामुळे जसे आज आपण सगळ्या जणांनी मेहनत करून दाखवून या कोळी समाजाच्या महिलांची आरोग्याची तपासणी केली, तशी पुढची चार वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वात या मतदारसंघाच्या लोकांच्या मतदारांची पण आरोग्याची काळजी आणि भविष्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या भारतीय जनता जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे, हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. आणि मग त्यासाठी मला तुम्ही कधीही बोलवा, कधीही सांगा, माझी तयारी आहे. पण या मतदार संघाचा वनवास या निमित्ताने तो मिटवण्याचे काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. या विधानसभेला थोडक्यात वाचलेला म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे आणि किती म्यांव म्यांव करतो. आम्ही इथे भरघोस मतांनी निवडून आलेले तीन तीन वेळा टर्मचे आमदार आहोत आणि हा काठावर निवडून येतो आणि एवढा म्यांव म्यांव करतो. हा विकास काय म्हणतो, बाबा त्याचे स्वतःचे वडील अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, स्वतः कॅबिनेट मंत्री होता, तरी पण आपल्या मतदारसंघाची परिस्थिती बदलू शकला नाही. म्हणून एवढंच मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि त्याची झलक आणि त्याचा ट्रेलर तुम्हाला या मुंबई महापालिकेच्या निमित्ताने या मतदार संघाच्या प्रत्येक वॉर्डवर भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कामाला लागा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक वॉर्डात भाजपचा नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले."


मंत्री राणे यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले की, "या मतदारसंघाचा वनवास संपवण्याची आणि विकासाचा मार्ग सुरू करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. मी नेहमीच तुमच्यासोबत आहे आणि माझे मंत्रालय तुम्हाला लागेल तिथे मदतीसाठी कायम उपलब्ध असेल."

Comments
Add Comment

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय