प्रतिनिधी: एसबीआयने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. एसबीआयने ऑटो स्वीप सेवेची किमान मर्यादा वाढवली आहे अशी माहिती बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता जर ग्राहकांच्या खात्यात ५०००० रूपयांपेक्षा अधि क रक्कम शिल्लक असल्यास ती आपोआप फिक्स डिपॉझिट मध्ये रूपांतरित होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ३५००० रूपये होती ती वाढत आता बँकेने ५०००० रूपये केली आहे. याविषयी बोलताना बँकेने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे कळवले आहे की, 'आम्ही कळवत आहोत की बचत बँक खात्यांमध्ये ऑटो स्वीप सुविधेसाठी किमान मर्यादा ३५०००/- रुपयांवरून ५००००/- रुपये करण्यात आली आहे. म्हणून, पुढील एमओडी (मल्टी ऑप्शन डिपॉझिट MOD) ५००००/- रुपयांपासून सुरू होईल.'
नक्की SBI Multi Option Deposit Scheme MODS काय आहे?
या योजनेअंतर्गत नेहमीच्या बचत खात्यापेक्षा अधिक परतावा ग्राहकांना मिळतो. म्हणजेच ठेवीवर अधिकचा व्याजदर मिळतो. ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम शिल्लक असल्यास ती रक्कम आपोआप एफडीत रूपांतरित होते. जर कधी बचत खात्यातील शि ल्लक रक्कम (Balance Amount) किमान बँलन्सची पूर्तता करण्यास सक्षम नसेल तर ही एफडीतील रक्कम बँक पुन्हा बचत खात्यात फिरवेल. ती पूर्ण अथवा अर्धी रक्कम असू शकते.
आपोआप MOD वरील व्याज तिमाही (Quarterly) आणि चक्रवाढ पद्धतीने (Compund Method) दिले जाते. जेव्हा MOD मध्ये ब्रेक येतो तेव्हा ठेवलेल्या कालावधीसाठी अस्तित्वात असलेल्या व्याजदराने दंडासह शिल्लक फरकावर रक्कम आकारली जाते. उर्वरित ठेवीवर मूळ दराने व्याज मिळत राहते. लागू असल्यास TDS देखील कापला जातो. या योजनेअंतर्गत मात्र जेष्ठ नागरिकांना अधिकचा व्याजदर मिळतो मात्र अतिशय ज्येष्ठ नागरिकांना हा व्याजदर फायदा मिळत नाही.
प्रकिया नक्की कशी पार पाडली जाते?
जेव्हा खातेधारकाची SBI MOD ठेव परिपक्व (Matured) होते, तेव्हा बँक आपोआप उर्वरित परिपक्वता रक्कम त्यांच्या लिंक्ड बचत खात्यात हस्तांतरित करते. म्हणून, परिपक्वतेवर, संपूर्ण शिल्लक (मुद्दल + व्याज वजा कोणतेही पैसे काढणे) थेट त्यांच्या बचत खात्यात जमा होते.
बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीत,'एसबीआय एमओडी योजनेचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना जास्त व्याजदर मिळवून देणे, बचत बँक खात्यातून एका मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या अतिरिक्त निधीतून टर्म डिपॉझिट्स (एमओडीएस) मध्ये स्वयंचलितपणे ह स्तांतरित केले जाते. डेबिट आदेशाचे पालन करण्यासाठी बचत बँक खात्यात रक्कम कमी पडल्यास, मुदत ठेवींमधून आंशिक/पूर्ण पैसे काढणे (रिव्हर्स स्वीप) केले जाईल आणि बचत बँक खात्यात परत जमा केले जाईल.' असे सांगण्यात आले आहे.