सोन्याचांदीत भूकंप सोने व चांदी नव्या उच्चांकावर 'या' कारणांमुळे

मोहित सोमण:फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीच्या अनिश्चितेमुळे युएस बाजारासह जगभरातील सोन्यात मोठी वाढ नोंदवली गेली. भारतही दरवाढीच्या बाबतीत मागे राहिला नसून आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सोन्याने नवा पराक्रम केला आ हे. आज सोन्यात सलग तिसऱ्यांदा उच्चांकी वाढ झाली. सध्या अस्थिरतेसह सणासुदीच्या काळातही गुंतवणूकदार सोन्याच्या सुररित गुंतवणूकीकडे झुकल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७७.१० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५८ रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १११२८ रूपये, २२ कॅरेटसाठी १०२०० रूपये, १८ कॅरेटसाठी ८३४६ रूपयां वर गेला आहे.माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ७७१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ७०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५८० रूपयाने वाढ झाली आहे.परिणामी २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर प्रथमच १११२८० रू पयावर गेला असून २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १०२००० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ८३४६० रूपयांवर गेला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १११७१ रूपये, २२ कॅरेटसाठी १०२४० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४७५ रूपयांवर पोहोचले आहेत.


जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२४% वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.२८% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३६४४.६६ औंसवर गेली आहे. भा रतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२६% वाढ झाल्याने दरपातळी १०९२६५ रूपयांवर पोहोचली. यासह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, ऑक्टोबरमध्ये सर्वा धिक व्यवहार झालेल्या डिलिव्हरीचा भाव ५७२ रुपये किंवा ०.५२ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १०९५५३ रुपये झाला आणि १६५३३ लॉटचा व्यवहार झाला.मंगळवारी सोन्याने प्रति १० ग्रॅम १०९८४० रुपयांचा उच्चांक गाठला होता. डिसेंबर महिन्यातील डिलिव्हरी देखील एमसीएक्सवरील ५५१३ लॉटमध्ये ५९३ रुपयांनी किंवा ०.५४ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम ११०६४० रुपये झाली, जी सतत तेजीची गती दर्शवते. आजही कमोडिटी बाजारातील गोल्ड स्पॉट बेटिंगमध्ये वाढ झाल्याने तसेच पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत रु पयाची घसरण झाल्याने भारतीय सराफा बाजारात सोने आणखी महागले.


रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर भारत आणि चीनवर जास्त शुल्क लादण्यासाठी जी-७ सहयोगी देशांना दबाव आणण्या च्या अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे, मध्य पूर्व प्रदेश आणि युक्रेनमध्ये संघर्ष तीव्र झाल्यामुळे, भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सुरक्षित-आश्रयस्थानांच्या मागणीला आणखी बळकटी मिळाली आहे.


चांदीच्या दरातही मोठी वाढ कायम


चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २.१० रूपयांनी, प्रति किलो दरात २१०० रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचे दर प्रति ग्रॅमसाठी १३२ व प्रति किलोसाठी १३२००० या नव्या उंचीवर पोहो चले आहेत. भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १३२० रूपये, प्रति किलो दर १३२००० रुपयांवर गेले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.९०% वाढ झाली आहे. तसेच भारतीय कमोडिटी बाजारा तील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात १.६७% इतकी मोठी वाढ झाल्याने चांदी दरपातळी १२९०५५ रूपयांवर गेली. पुढील आठवड्यात युएस बाजारातील फेड व्याजदरात कपातीची शक्यता निर्माण झाल्याने स्थिर गुंतवणूकीसाठी चांदीचा मार्ग स्विकारला त सेच वाढत्या मागणीमुळे सोन्यासह चांदीतही वाढ झाली ‌आहे.डिसेंबरमध्ये सर्वाधिक व्यवहार झालेल्या डिलिव्हरीनेही एमसीएक्सवर १,६७४ किंवा १.३२% वाढ करून १२८६१२ रुपये प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी

'प्रहार' विशेष: चष्मा खेळणे नसून 'जीवनसाथी' Zeiss च्या मुंबईतील नव्या दालनात १८० डिग्री फेशियल इमेजनिंगचा अनुभव घ्या

मोहित सोमण चष्मा हा लहानांपासून थोरल्यापर्यंत जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन

कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील

अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई २.०७% वर पोहोचली मात्र.....

प्रतिनिधी:भारताच्या किरकोळ महागाईत (Retail Inflation) निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर ऑगस्टला २.०७% वाढ झाली आहे. सांख्यिकी

Urban IPO Day 3: शेवटच्या दिवशी Urban Company IPO ची शानदार कामगिरी

मोहित सोमण:अर्बन कंपनीच्या आयपीओने (Urban Company IPO) अखेर शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशीही