मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक


मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या जीआरवर आपला संताप व्यक्त केला. सरकारने कुणबी नोंदी संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार आहे. विशेषतः मागील २० वर्षांत ओबीसी समाजाला फार कमी निधी मिळाला. पण त्या तुलनेत मागील २-३ वर्षांतच मराठा समाजाला त्याहून कितीतरी जास्त निधी मिळाला असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात बुधवारी ओबीसी उपसमितीची पहिली बैठक झाली. या बैठकीला समितीचे सदस्य छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, अतुल सावे, संजय राठोड, दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मगास बहुजन कल्याण विभागाचे सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यात भुजबळ यांनी मराठा समाजाच्या तुलनेत ओबीसींना फार कमी निधी मिळत असल्याची खंत व्यक्त केली. सरकारच्या जीआरमधील काही शब्दांवर आक्षेप नोंदवत ओबीसींना फटका बसेल, असा जीआर काढल्या प्रकरणी इतर मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांवरही राग व्यक्त केला.


निधी प्रकरणी राज्य सरकार व वित्त विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणाचे समर्थन होऊच शकत नाही. जीआर निघाल्यामुळे आपण सर्वजण असहाय्य झालो आहोत. इथे प्रश्न सुटला नाही, तर आम्ही थेट कोर्टात जाऊन निर्णय घेऊ, असे भुजबळ म्हणाले.

Comments
Add Comment

राज्यात ‘नो पीयूसी, नो फ्युएल’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय

वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न भाईंदर (वार्ताहर) : दहिसर चेक नाक्यावरील टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी

डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या; अमेरिकेत राजकीय हिंसाचाराची चर्चा

वॉशिंग्टन: अमेरिकेतील प्रसिद्ध पुराणमतवादी (conservative) कार्यकर्ते आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती

बीडमध्ये रस्ते अपघातात नातीसह सरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच

पूल वाचवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे पूल वाचवल्यास प्रकल्प खर्च आणि कालावधीही