महाराष्ट्र हे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य

उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान


मुंबई:महाराष्ट्र हे देशातील एक उद्योग स्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम आहे. तसेच इज ऑफ ड्यूइंग बिसनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां नी केले. जियो वॉर्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या राऊंड टेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर अस ल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन आणि परिपूर्ण धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राची समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मो ठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. ही एक खिडकी योजना (Window Scheme) असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांग ला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले आहेत की, 'इज ऑफ ड्यूइंग बिसनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरा मुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापन, त्यावरील प्रक्रिया, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतव णुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पा याभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत.' तसेच शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


या राऊंड टेबल कॉन्फरन्स पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. आता ते शि क्षण नवी मुंबई येथील एज्यू सिटी मध्ये मिळणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल. गडचिरोली ही देशा ची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगण यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पाकव्याप्त काश्मीर पेटला! लष्कराची सुद्धा केली नाकांबदी; पीओकेत पाक सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार ; १० जणांचा मृत्यू तर १०० जखमी

जीवनावश्यक वस्तूंवरील सबसिडी रद्द केल्याने जनक्षोभ उसळला! आंदोलकांकडून सैनिकांचा 'मानवी ढाल' म्हणून

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द