Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती


रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.


या पदांकरिता अर्ज करण्यासाठी www.https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.


या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज व राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन नमुना अर्ज असे दोन्ही अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांकडे राहतील.


शिकाऊ उमेदवारी भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत रिक्त पदे अशी आहेत - यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २.

Comments
Add Comment

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी

सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या

बीडमध्ये रस्ते अपघातात नातीसह सरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या