Air India flight : सिंगापूर फ्लाइटमध्ये गोंधळ; २०० प्रवाशांना अचानक उतरवले विमानातून!

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात अजूनही ताजा असतानाच, एअर इंडियाच्या विमानांमधील सातत्याने येणारे तांत्रिक बिघाड आता चिंतेचा विषय ठरत आहेत. अहमदाबाद दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला, तर उर्वरित सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी चेन्नई विमानतळावरही एअर इंडियाच्या एका विमानाची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली होती. प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, नुकतीच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीहून सिंगापूरला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते. या घटनेमुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.



सिंगापूर फ्लाइटमधून २०० प्रवाशांना उतरवलं


सिंगापूरला जाणाऱ्या या विमानात तब्बल २०० हून अधिक प्रवासी दोन तासांहून अधिक काळ बसून होते, मात्र अचानक सर्वांना विमानातून उतरवण्यात आले.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीहून सिंगापूरकडे रवाना होणार होते. प्रवासी आपापल्या जागांवर बसल्यानंतर अचानक कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकताच अहमदाबाद ते लंडन या विमानाचा भीषण अपघात, त्याआधी चेन्नईतील आपत्कालीन लॅंडिंग, आणि आता दिल्लीतील ही घटना – प्रवाशांचा एअर इंडियावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



एअर इंडियाच्या विमानातील एसी बिघाड


सिंगापूरला जाणारे एअर इंडिया फ्लाइट AI२३८० काल रात्री ११ वाजता उड्डाण करण्याचे वेळापत्रक होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे विमान वेळेवर निघू शकले नाही. प्रवाशांना विमानात बसवण्यात आले, पण एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये गंभीर बिघाड झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. उष्णतेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. तब्बल दोन तास प्रवासी विमानातच बसून राहिले, तरीही समस्या सुटत नव्हती. शेवटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेची पुष्टी करताना एअर इंडियाकडून अधिकृत माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, एसी सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली. विमानाच्या तांत्रिक तपासणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले. या घटनेमुळे प्रवाशांचा त्रास तर झाला, पण त्याचसोबत एअर इंडियाच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर पुन्हा एकदा बोट ठेवले गेले आहे.



एअर कंडिशनिंग सिस्टीम ठप्प


विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टीमने काम करणे बंद केले, एवढेच नव्हे तर काही वेळ विमानातील लाईट्सही ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. सुमारे दोन तास प्रवासी विमानात बसून राहिले, पण समस्या सुटली नाही. शेवटी सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीकडे नेण्यात आले. याआधीच अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातापूर्वी प्रवाशांनी कुलिंग व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता दिल्लीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमान सुरक्षेवर आणि तांत्रिक देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एअर इंडियाकडून दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासणी सुरू असून समस्या सुटल्यावरच विमानाच्या पुढील प्रवासाचा निर्णय घेतला जाईल.

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.