मोहित सोमण: उद्यापासून बहुप्रतिक्षित अर्बन कंपनी लिमिटेड (Urban Company Limited IPO) बाजारात दाखल होणार आहे. १९०० कोटी रुपयांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात या आयपीओविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ४.५८ कोटी शेअर्सचा हा फ्रेश इश्यू असणार आहे. म्हणजेच या शेअरचे एकूण मूल्यांकन ४७२ कोटी रुपये असणार आहे. तर ऑफर फॉर सेल (OFS) साठी १३.८६ कोटी शेअर १४२८ कोटी रूपये मूल्यांकनासह उपलब्ध असतील. उदया १० ते १२ सप्टेंबर कालावधीत हे शेअर गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. १७ सप्टेंबरला बीएसई व एनएसईत सूचीबद्ध होईल. ९८ ते १०३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल लिमिटेड (Kotak Mahindra Capital Limited) ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. एमयुएफजी इ़टl लिमिटेड (MUFG Lim ted) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आर अँड डी (Resea rch and Development), विस्तारीकरणासाठी, पूर्वीच्या थकबाकी व इतर दैनंदिन कामकाजासाठी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आयपीओसाठी ९% सवलत मिळणार असल्याचे यावेळी कंपनीने स्पष्ट केले होते.एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी ७५% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (R etail Investors), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४५ शेअर आयपीओत खरेदी करावे लागतील.
अभिराज सिंह भाव, राघव चंद्रा, वरुण खैतान हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल २१% होते जे आयपीओनंतर आणखी घसरले.डिसेंबर २०१४ मध्ये स्थापन झालेली, अर्बन कंपनी ही एक तंत्रज्ञान-चालित, पूर्ण-स्टॅक ऑनलाइन बाजारपेठ आहे जी घर आणि सौंदर्य सेवा (Home and Beauty Services) प्रदान करते.३० जून २०२५ पर्यंत, कंपनी च्या सौदी अरेबियाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सेवा देणाऱ्या शहरांना वगळता, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरमधील ५१ शहरांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.कंपनीने दिलेल्या माहि तीनुसार, यावर्षी कंपनीचा महसूल इयर ऑन इयर बेसिसवर ३८% वाढला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये तब्बल ३५८% वाढ झाली. सध्याचे कंपनीचे बाजार भां डवल (Market Capitalisation) १४७८९.५५ रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनीच्या मूळ किंमतीपेक्षा आयपीओतील पूर्वसंध्येला जीएमपी (Grey Market Price GMP) ३६.५ रूपये प्रति शेअर प्रिमियम दराने सुरु आहे.