वाकोला पुलावरील खड्ड्यांवर कायमचा उपाय

पुलावरील विद्यमान डांबराचा थर उकरून नव्याने बसवणार


मुंबई (प्रतिनिधी) : वाकोला पुलावर खड्डे पडल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. मात्र, या पुलाचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले असले तरी पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई महापालिकेला हस्तांतरित झाल्याने त्यावरील पुलांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या खांद्यावर पडली. त्यामुळे या पुलावरील खड्डे बुजवून महापालिकेने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरीही हा कायमस्वरूपी उपाय नसून यावरील डांबराचा थर उकरून काढून नव्याने रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण केल्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे पावसानंतर या पुलावरील डांबराचा थर उकरून काढून त्यावर नव्याने डांबराचा थर चढवला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिका पूल विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे.


मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपूल नेहमीच चर्चेत असतो, विशेषतः पावसाळ्यात. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडले असून, छोटे-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा पूल बांधला असला, तरी सध्या या पुलाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची यावर स्पष्टता नसली तरी अप्रत्यक्ष याची देखभाल मुंबई महापालिकेच्या खांद्यावर आहे.


वाकोला पुलावर मुसळधार पावसामुळे या ठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खड्ड्यांमुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही, तर वाहनांचे नुकसानही होत आहे. तसेच, दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती केली असली, तरी काही दिवसांनी खड्डे पुन्हा दिसून येत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.


या पुलावरील खड्ड्यांची वारंवार दुरुस्ती करूनही खड्डे पुन्हा का पडतात, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे खड्डे पुन्हा लवकरच निर्माण होतात, अशी टीका होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. मुख्यमंत्री आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई महापालिकेला हस्तांतरित झाल्याने या वाकोला पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर टाकली गेली आहे. त्यामुळे या पुलाचे निकृष्ठ काम झाल्याने यावरील डांबराचा थर काढून नव्याने थर टाकण्याचा विचार महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी या पुलावरील जेवढे खड्डे होते ते बुजवण्याचे कार्यवाही केली.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,