गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी असलेल्या शालीमार या ५ मजली इमारतीला अचानक आग लागल्यामुळे, नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.


गोरेगाव पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील सिद्धी गणेश सोसायमधील शालिमार या पाच मजली इमारतीला आज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत असून विविध अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.





आग लागण्याचे कारण?


आगीचे कारण समोर आले असून, इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने दुपारी १२.२५ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र. १) असल्याचे घोषित केले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती