IND vs UAE: सूर्या ब्रिगेडची विजयी सलामी, भारताने यूएईला ९ विकेटनी हरवले

दुबई: आशिया कप २०२५मध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यूएईवर दणदणीत विजय मिळवला आहे. यूएईवर भारताने ९ विकेट राखत विजय मिळवला आहे. या सामन्यात यूएईने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अवघ्या ५७ धावाच केल्या. ५७ धावांतच त्यांचे १० गडी बाद झाले. कुलदीप यादवने चार बळी घेतले तर शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या.


आजचा हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यूएईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३.१ षटकांत केवळ ५७ धावा केल्या. यूएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर त्याच्यापाठोपाठ सलामीवीर मोहम्मद वसीमने १९ धावा केल्या.


त्यानंतर भारताचे सलामीवीर ही धावसंख्या पूर्ण करण्यास पुरेसे ठरले. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावा ठोकल्या तर सलामीवीर शुभमन गिलने नाबाद २० धावांची खेळी केली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या सूर्याने नाबाद ७ धावा केल्या.

भारताचा पुढील सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. १४ सप्टेंबरला हा सामना रंंगत आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात