जीएसटी कपात झाली आता सरकारकडून व्यापारांसाठी महत्वाचा निर्णय

प्रतिनिधी: आता जीएसटी कपातीनंतर जुन्या वस्तूंचा साठा (Goods Stocks) नव्या एमआरपी (Maximum Retail Price MRP) सह विकता येणार आहे. सरकार यावर गांभीर्याने विचार करत असून किंमतीच्या पुनर्रचनेला सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे खपला गेला नसलेला माल विक्रेते जीएसटी दरकपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे आपला थकलेला माल क्लिअरन्स (Stock Clearance) करण्यासाठी व्यापारांना मदत होईल. हा निर्णय उत्पादक व आयातदारांना लागू असेल. सरकारने कंपन्यांच्या आग्रहाखातर या निर्णयाला मान्यता दिली.

त्यामुळे सरकारने नवीन जीएसटी नियमांनुसार पॅकेज केलेल्या वस्तूंचे उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना विक्री न झालेल्या स्टॉकवर सुधारित एमआरपी छापण्याची परवानगी दिली आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत विद्यमान पॅकेजिंग साहित्य आणि रॅपर्स संपवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जीएसटी कपातीमुळे पुनर्मुद्रित (Reprinting) करून कंपन्यांना माल नव्या छापील किंमतीसह विकता येईल. कंपन्यांनी नव्या किंमतीचा आग्रह करण्याचे मुख्य कारण म्हणजे जुन्या किंमतीसह पॅकेजिंग वाया जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उद्योजककांनी किंमत पुनर्मुद्रित करण्याची परवानगी मागितली होती.

उद्योग संस्थांकडून अर्थ मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार विभागाला पाठवलेल्या पत्रांमध्ये, कंपन्यांनी असे निदर्शनास आणून दिले की त्यांच्याकडे पुरवठा साखळीत (Supply Chain) साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा साठा असतो, ज्यामध्ये लाखो वस्तूंचा समावेश असतो. त्यामुळे अखेरीस सरकारने नव्या नियमांसह व्यापारी वर्गाला दिलासा दिला आहे.
Comments
Add Comment

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेल्या

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून