नियमित रेशन न घेणारे ठरणार अपात्र

३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद


अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा नियमित धान्य पुरवठा आता बंद होणार आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने तशी पावले उचलायला सुरुवात केली आहे. सलग सात महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या रायगड जिल्ह्यातील १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे.


जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील मिळून ४ लाख ४८ हजार ८६९ एवढी रेशनकार्ड आहेत. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य न उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लाभार्थी असूनही धान्य उचलत नसल्याने अशा ग्राहकांचे धान्य बंद करून इतर लाभार्थ्यांना मिळावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजनाही बंद केली आहे.


मागील काही वर्षे सणासुदीच्या दिवसात गोरगरीब नागरीकांना सण उत्साहात, आनंदात साजरा करता यावा यासाठी मैदा आदी शिधा अवघ्या १०० तेल, साखर, रवा, चणाडाळ, रुपयांत दिला जात असे. कधी कधी उशिरा का होईना गोरगरीबांना तो मिळत होता; परंतु शासनाने तो आता बंद केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही हा शिधा मिळालेला नाही.


माहितीच्या आधारे सलग सात महिने धान्याची उचल न केलेल्या १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद केले आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत संर्व अंत्योदय आणि प्राधान्य योजने अंतर्गत मोफत धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय कार्ड धारकांना प्रतिकार्ड ३५ किलो, तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो मोफत धान्य मिळते. असे असूनही लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तपासणी अंती लक्षात आल्यावर गेल्या सात महिन्यांपासूनच धान्य बंद केले आहे.

Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.