टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकलच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी कमी केल्याचा लाभ मिळणार

मुंबई:भारतातील मोठ्या (कमर्शियल) वाहन उत्पादक कंपन्यापैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण व्यवसायिक वाहन (Commercial Vechile CV) श्रेणीवरील अलीकडील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देणार असल्याची घोषणा के ली. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून सुधारित जीएसटी दर आणि हा लाभ लागू होईल असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


या लाभाविषयक प्रतिकिया देताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले आहेत की,' वाणिज्यिक वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत कमी करणे हे भारताच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्सला पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने टाकलेले एक धाडसी आणि महत्त्वाचे पाऊल आहे. माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातून आणि माननीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या प्रगतीशील सुधारणांनी प्रेरित होऊन टाटा मोटर्सला आमच्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा देशभरातील ग्राहकांना देताना अभिमान वाटतो. विश्वासाचा समृद्ध वारसा व भविष्यासाठी तयार वाहने आणि वेगवान उपाययोजनांच्या व्यापक पोर्टफोलिओसह आम्ही भारताची प्रगती करणाऱ्यांसाठी एक उत्तम भागीदार आहोत. आम्ही व्यवसाय, गतिशीलता सक्षम करून वाढीला चालना देतो.


वाणिज्यिक वाहने ही भारताच्या आर्थिक इंजिनाच्या पाठीचा कणा आहेत - लॉजिस्टिक्सला चालना देणे, व्यापार सक्षम करणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील समाजाला जोडणे या गोष्टी ती करतात. टाटा मोटर्सचे उद्दिष्ट आमच्या वाणिज्यिक वाहन श्रेणीतील किम ती कमी करून वाहतूकदार, फ्लीट ऑपरेटर आणि लहान व्यवसायांसाठी मालकीचा एकूण खर्च आणखी कमी करणे हे आहे. यामुळे प्रगत आणि स्वच्छ गतिशीलता उपायांपर्यंत अधिक प्रवेशासह जलद फ्लीट आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे वाह तूकदार खर्च कमी करू शकतील, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारू शकतील आणि नफा वाढू शकेल.२२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या टाटा मोटर्स कमर्शियल वाहनांवरील संभाव्य किमती किती प्रमाणात कमी होतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. ग्रा हकांना आगामी सणासुदीच्या काळात डिलिव्हरीसाठी त्यांचे पसंतीचे वाहन लवकर बुक करण्यास आम्ही प्रोत्साहित करत आहोत.'


जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स शोरूममध्ये तुमच्या प्राधान्याच्या वाणिज्यिक वाहन प्रकाराची निश्चित किंमत खात्री करून घ्या.


उत्पादनवरील सूट पुढीलप्रमाणे -


Reduction in price range (Rs)


HCV from 280000 to 465000


ILMCV from 100000 to 300000
Buses & Vans


from 120000 to 435000


SCV Passenger


from 52000 to 66000


SCV & Pickups


from 30000 to 110000

Comments
Add Comment

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,

जीएसटी दरकपातीचा ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फायदा प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होणार!

प्रतिनिधी:सरकारने जीएसटी दरकपातीचा निर्णय घेतल्यानंतर ऑटो क्षेत्रात जबरदस्त बूम आली आहे. नव्या ५%,१२% स्लॅबमुळे

इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ 'या' कारणास्तव

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीचा शेअर सकाळी १० वाजेपर्यंत ३.८०% उसळल्याने आज बाजारात रॅली होण्यास कंपनीच्या शेअरने

Stock Market Update: सकाळच्या सत्रात सलग दुसऱ्यांदा वाढ आयटी शेअर्समध्ये तुफानी

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्यांदा सकाळच्या सत्रात वाढ

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे, हिंसक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय

काठमांडू: नेपाळ सरकारने देशात सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे