नोकरी घोटाळ्यांमध्ये वाढ रोखण्यासाठी लिंक्डइनने नवीन पडताळणी वैशिष्ट्ये सादर केली
मुंबई:भारतातील रोजगार बाजारपेठ जगातील सर्वात झपाट्याने विकसित होणारी डिजिटली सक्षम असणारी म्हणून ओळखली जाते.मात्र संधी वाढत असताना जोखीम देखील वाढत आहेत. ऑनलाइन रोजगाराशी संबंधित घोटाळे वाढत आहेत, ज्यामुळे उमेदवा रांना आर्थिक आणि भावनिक नुकसान सहन करावे लागत आहे, विशेषतः अशा वेळी अनेकांना संधींबद्दल अनिश्चितता वाटू शकते.तज्ञांच्या मते, सर्वोत्तम संरक्षण म्हणजे दक्षता, जागरूकता आणि विश्वासार्ह साधने. या परिवर्तनामुळे गेल्या वर्षभरात भारतात लिंक्ड इनवर सत्यापन स्वीकारण्याचे प्रमाण २.४ पट वाढले आहे, जेथे प्रोफेशनल्स कनेक्ट होताना, अर्ज करताना किंवा नियुक्ती करताना अधिक आत्मविश्वासाचा शोध घेतात.
विश्वास वाढवण्यासाठी नवीन पुढाकार
प्रोफेशनल्सची सुरक्षितता आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने लिंक्डइनने ऑनलाइन परस्परसंवाद अधिक सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केलेली नवीन सत्यापन वैशिष्ट्ये लाँच केली आहेत:
विस्तारित कंपनी पेज व्हेरिफिकेशन: आता अधिक व्यवसायांसाठी खुला आहे, ज्यामध्ये पेड प्रीमियम पेज सबस्क्रिप्शन असलेल्या लहान व्यवसायांचा समावेश आहे. ८५% व्यवसाय ग्राहक म्हणतात की व्यवसाय कोणासोबत करायचा हे निवडताना विश्वास म हत्त्वाचा आहे. ज्यामुळे हे विस्तारीकरण वाढत्या कंपन्यांना ग्राहक, संभाव्य ग्राहक आणि रोजगार शोधणाऱ्यांसोबत मजबूत संबंध निर्माण करण्यास मदत करते.
रिक्रूटर वर्कप्लेस व्हेरिफिकेशन:'रिक्रूटर' किंवा 'टॅलेंट अँक्विझिशन स्पेशालिस्ट' सारख्या रिक्रूटर रोजगार शीर्षकांची भर किंवा अपडेट करतात अशा सदस्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये शीर्षकाची भर करण्यापूर्वी त्यांच्या कामाच्या जागेचे सत्यापन करणे आवश्य क आहे. यामुळे रोजगार शोधणाऱ्यांना विश्वास मिळतो की, ते खऱ्या प्रोफेशनल्सशी संवाद साधत आहेत आणि पहिल्या संवादातून रिक्रूटर्सना विश्वास निर्माण करण्यास मदत होते.
कार्यकारी पदाचे सत्यापन: (Executive Job Title Verification) - नेतृत्वाची तोतयागिरी रोखण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांसाठी आता कामाच्या ठिकाणी सत्यापन (Verification) आवश्यक असेल.
हे अपडेट्स व्यापक सुरक्षा प्रयत्नांवर आधारित आहेत: (Build on Broader Security Efforts) - २०२३ पासून लिंक्डइनने ओळखपत्रांसाठी, नोकऱ्यांसाठी, कंपनी पेजसाठी आणि रिक्रूटर्ससाठी सत्यापन (verifications) सुरू केले आहे. जागति क स्तरावर, लिंक्डइनवर ९ कोटींहून अधिक प्रोफशनल्सचे सत्यापन केले जाते आणि त्यांना ६०% हून अधिक प्रोफाइल व्ह्यूज व ३०% हून अधिक कनेक्शन रिक्वेस्टसह फायदा दिसत आहे. तसेच लिंक्डइनवर रिक्रूटर्सकडून १३% अधिक इनमेल्ससह रोजगार शो धामध्ये प्रतिसाद मिळण्याची उच्च शक्यता आहे.ही वैशिष्ट्ये लिंक्डइनच्या विद्यमान सुरक्षा पायाभूत सुविधांवर आधारित आहेत, ९९% जास्त आढळलेली बनावट खाती आणि घोटाळे नोंदवण्यापूर्वीच ब्लॉक होतात. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान लिंक्डइनने जागतिक स्तरावर नोंदणीच्या वेळी ८०.६ दशलक्षाहून अधिक बनावट खाती ब्लॉक केली.
तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे.
लिंक्डइन इंडियाच्या लीगल अँड पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख अदिती झा (Aditi Jha, Head of Legal & Public Policy at LinkedIn India) रोजगार शोधताना सुरक्षितता बाळगण्यासाठी पालन करावयाच्या टिप्सबाबत म्हणतात -
ऑनबोर्डिंग करण्यापूर्वी कधीही बँक तपशील शेअर करू नका.
संशयास्पद विनंत्या नाकारा, कायदेशीर नियोक्ते तुम्हाला एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास किंवा पैसे पाठवण्यास सांगणार नाहीत.
धोक्याची चिन्हे आणि बऱ्याचदा खूप चांगल्या वाटणा-या पदांबाबत दक्ष राहा.
खाते सेटिंग्ज अपडेट ठेवा, रिकव्हरी पर्यायांची भर करा आणि सुरक्षा वैशिष्ट्ये सुरू ठेवा.
नोकरी शोधताना सुरक्षितता वाढवण्यासाठी लिंक्डइनकडे अनेक साधने देखील आहेत:
जॉब पोस्टिंग्जवर सत्यापित माहिती तपासा: जॉब पोस्टिंगवर व्हेरिफिकेशन बॅज (verification badge on a job posting) म्हणजे कंपनी किंवा जॉब पोस्टरबाबत सत्यापित माहिती आहे. पोस्टर अधिकृत कंपनी पेजशी संलग्न असेल तर विशिष्ट वर्कप्लेस सोबतचा त्याचा सहयोग सत्यापित केलेला आहे किंवा आमच्या एका आयडेण्टिटी व्हेरिफिकेशन सहयोगीच्या माध्यमातून त्यांची ओळख सत्यापित करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो.
मॅसेज वॉर्निंग्ज चालू ठेवा: (Enable Message Mornings) लिंक्डइनच्या घातक कन्टेन्टचे पर्यायी ऑटोमेटेड डिटेक्शन (LinkedIn’s optional automated detection of harmful content) चालू ठेवा, जे संभाव्य घातक घोटाळ्यांना ओळखू श कते.
सत्यापनांसह (Verification) रोजगाराचा शोध फिल्टर करा:तुम्ही आता फक्त सत्यापनांसह रोजगार दाखवण्यासाठी जॉब सर्च फिल्टर (filter your job search to show only jobs with verifications) करू शकता. फिल्टर तुम्हाला सत्यापित लिं क्डइन पेज असलेले कंपन्यांनी पोस्ट केलेले रोजगार आणि या कंपन्यांशी संलग्न असलेले विद्यमान जॉब पोस्टर्स शोधण्याची सुविधा देतो. टॉगल केल्यानंतर फक्त या सत्यापनांसह रोजगार तुमच्या सर्च परिणामांमध्ये दिसतील आणि फिल्टर या सर्च हेडरमध्ये दि सण्यात येईल.
पासकी सेट करा. पासकी (Pass Key) तुम्हाला तुमचे डिवाईस अनलॉक वापरण्याची सुविधा देतात. उदाहरणार्थ, तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरील टच आयडी आणि तुमचे खाते अँक्सेस करण्यासाठी. पासकी सेट केल्याने तुमचे खाते सुरक्षित राहण्यास मदत होते, तसेच तुम्ही सहज आणि जलद लॉग इन देखील करू शकता. फिशिंगसारख्या फसव्या क्रियाकलापांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पासकी हे सर्वात प्रभावी साधन आहे.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा: टू-स्टेप व्हेरिफिकेशन खाते अँक्सेस करण्यासाठी एकापेक्षा अधिक सत्यापन पद्धतीचा वापर करते आणि बहुतांश खात्यांना नवीन किंवा अज्ञात संगणक किंवा डिवाईसेसमधून अनधिकृत अँक्सेस कमी करू शकते.