लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे.


दरम्यान मुंबईतील लालबाग परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, तिचा ११ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला  आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं. या अपघातात २ वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ ११  वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि कोणतीही मदत न करता तो घटनास्थळावरुन पसार झाला.


या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे